लाडेवडगाव येथे दोन सख्ख्या भावांचा
शेततळ्यात बुडून मृत्यू;
केज तालुक्यातील दोन दिवसातील दोन घटना मध्ये तीन जणांचा मृत्यू
केज / प्रतिनिधी केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे दि. २७ जुलै२०२१ रोजी दोन सख्ख्या भावांचा शेत तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केज तालुक्यातील दोन दिवसातील ही सलग दुसरी घटना आहे. दोन दिवसात केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील या दोन घटनामध्ये तीन मृत्यू झाले आहेत.
दिनांक २७ जुलै मंगळवार रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील लाडेगाव येथे रोकड पट्टी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील शेत तळ्यात हर्षद माधव लाड (१० वर्ष) आणि उमेद माधव लाड (७ वर्ष) या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. तसेच दिनांक २६ जुलै रोजी शेलगाव गांजी येथेही आकांक्षा रेवनसिद्ध पटणे वय ११ वर्ष या मुलीचा श्रीमंत पटणे यांच्या शेतातील तलावात बुडून मृत्यू झाला.
युसूफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दिवसातील सलग दुसरी घटना असून या दोन्ही घटनेत एकूण तीन मुले दगावली आहेत.