क्यु.आर.कोड सेवेचा शुभारंभ
श्री गुरूजी पतसंस्थेचे ऑनलाईन बॅंकिंग मध्ये पदार्पण.
लातूर;ता.१४:
श्री गुरूजी पतसंस्थेच्या क्युआर कोड सेवेचा शुभारंभ कृष्णा सर्जीकल पॅथॅलाॅजीच्या संचालिका तथा श्री गुरूजी पतसंस्थेच्या संचालिका डाॅ.ऋजुता अयाचित यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी पतसंस्था अध्यक्ष अतुल ठोंबरे, सचिव संजय अयाचित, संचालक डाॅ.वैशाली टेकाळे, अर्कि विजय सहदेव, किशोर कुलकर्णी , सुधाकर जोशी, सुनिल बोकील, रविकांत मार्कंडेय, केशव शिंदे, मनोज सप्तर्षी, महेश औरादे उपस्थित होते.क्युआर कोडचा शुभारंभ करण्यापूर्वी पतसंस्थेच्या वतीने पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० जवानांना व लतादीदींना ‘ मेरी आवाज ही मेरी पहचान है ‘ ह्या गाण्यासह श्रध्दांजली वाहण्यात आली.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्र संचलन पतसंस्था व्यवस्थापक अमृता देशपांडे यांनी केले. पतसंस्थेचा मासिक अहवालाचे वाचन सरव्यवस्थापक संजय कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपदा भालेकर,बबलू दोलतडे, रेणूका कुलकर्णी, श्रीपाद खरोसेकर यांनी विशेष परिश्रम केले.




