उदगीर : येथील भाविकांचे श्रध्दास्थान
श्री गुरु हावगीस्वामी मंदिराच्या कामाचा माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांचे हस्ते आज मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश श्री श्री ष.ब्र.१०८ डाॅ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, बाजार समितीचे संचालक सुभाष धनुरे, बाबुराव समगे,विरभद्र सताळकर, श्रीकांत पाटील, रेखा कानमंदे, छाया बागबंदे, विमल गर्जे , बाबुराव पांढरे, बालाजी पाटील,
उध्दव महाराज हैबतपुरे, ओम विश्वनाथे, रमेश आठाणे, ब्याळे, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
आपण या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रत्येक जातीधर्माच्या नागरिकांना सोबत घेवुन काम करत असुन
‘उदगीरचा विकास हा एकच ध्यास’ घेवुन शहराचा कायापालट करण्याचे काम करत आहे. मागील काळात लिंगायत समाजबांधवांची लिंगायत भवनाची मागणी होती त्यांच्या मागणीचा विचार करुन लिंगायत
भवन बांधकामासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन देवून या भागातील समाजबांधवाची ईच्छा पूर्ण केली. त्या लिंगायत भवनाचेही काम सद्या प्रगतीपथावर चालु असुन लवकरच आपल्या समाजबांधवांच्या सेवेकरीता उपलब्ध होईल.

आपल्या सर्वांचे श्रध्दास्थान असलेले
श्री गुरु हावगीस्वामी महाराजांची यात्रा जानेवारी महिन्यात आपल्या भागात मोठ्या हर्षउल्हासात भरत असते, या यात्रेसाठी आपल्या भागासह परिसरातील भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. सर्वांचे भक्तीस्थळ असणाऱ्या श्री गुरु हावगीस्वामी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संधी आपण आज मला दिली, त्याबद्दल आ.बनसोडे यांनी
समाजबांधव व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

सदर मंदिराचे काम हे कुठल्याही प्रकारची शासकीय मदत न घेता केवळ भाविक भक्तांच्या लोकसहभागातुन होत आहे विशेष असल्याचेही आ. बनसोडे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.नंदकुमार पटणे यांनी केले. यावेळी भाविक – भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




