23.9 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeशैक्षणिक*श्री गुरूजी आयटीआयची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम*

*श्री गुरूजी आयटीआयची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम*


चैतन्य पाटील फिजिओथेरपी टेक्निशियन मध्ये औरंगाबाद विभागात सर्वप्रथम
■ प्रथम वर्षाचा निकाल  ९०.९० टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल ९२.७२
टक्के

लातूर 🙁 वृत्तसेवा )-अखिल भारतीय व्यवसाईक परीक्षा (NCVT) यानी जुन,जुलै महिण्यात घेतलेल्या आयटीआय परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये श्री गुरूजी आयटीआयच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. चैतन्य पाटील व संतोष बुर्ले या विद्यार्थ्यांने फिजियोथेरपी टेक्निशियन मध्ये एकसारखे ७५.५० टक्के गुण घेत दोघांनेही फिजियोथेरपी टेक्निशियन अभ्यासक्रमात औरंगाबाद विभागात सर्व प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. श्री गुरूजी आयटीआय साठी हा मानाचा तुरा आहे.

द्वितीय इलेक्ट्रिकल वर्षाच्या प्रतिक सावंत याने ९०.३३ % गुण घेऊन प्रथम, आवेज शेख ८८.३३% गुण घेऊन द्वितीय तर कु.साधना पटनुरे हिने ८८% गुण घेऊन काॅलेज मध्ये तृतीय आले आहेत. वायरमन अभ्यासक्रमासाठी तेजेस भिसे, मनोज करे, अशितोष कडवदे यांनी काॅलेज मधून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला आहे.

द्वितीय वर्षाचा निकाल ९२.७२%  तर प्रथम वर्षाचा निकाल  ९०.९० % लागला आहे. फिटरचा निकाल १०० टक्के  लागला आहे.
८०%  पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या २५ आहे. ७० % पेक्षा जास्त गुण घेणा-या विद्यार्थांची संख्या ९४ आहे. सातत्याने उत्कृष्ठ निकालाची परंपराचे  कायम ठेवण्यात याही वर्षी श्री गुरूजी आटीआय यशस्वी ठरली आहे.

श्री गुरूजी आयटीआय मध्ये शासकीय आयटीआय मधील ३५ वर्षे शिकवण्याचा अनुभव असलेले निवृत्त शिक्षकांचा शिक्षकवृंद , शंभर टक्के प्रॅक्टिकल व थेअरी, वर्षातुन तीन अभ्यास सहलीचे आयोजन , प्रत्येक महिण्याला अभ्यासक्रमासाठी  नियोजन बैठक तसेच दोन महिण्यातून एक परिक्षा अशा प्रकारे केलेल्या नियोजनामुळे श्री गुरूजी आयटीआयचा उत्कृष्ठ निकाल लागतो असे संस्था अध्यक्ष अभि.अतुल ठोंबरे यांनी सांगीतले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य संजय अयाचित, सुनिल बोकील, अर्कि.विजय सहदेव,भूषण दाते, सुधाकर जोशी,रविकांत मार्कंडेय, वैभव कवठाळकर, बाबा डोंगरेसर , होळकरसर, जी.टी.जोशी सर,पी.व्ही.देशमुख सर यांनी अभिनंदन  केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]