27.9 C
Pune
Saturday, February 14, 2026
Homeसांस्कृतिक*श्री जानाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी डॉ.गौरी कुलकर्णी*

*श्री जानाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी डॉ.गौरी कुलकर्णी*


सचिवपदी अमोल बनाळे तर कार्याध्यक्षपदी सी.ए.दिलीप रांदड◆
लातूर
;लातूर जानाई फंक्शन हॉल येथे श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाची रविवार दिनांक २५ जुन २०२३ रोजी बैठक अतुल ठोंबरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यामध्ये श्री जानाई प्रतिष्ठान संस्कृतिक मंडळ वर्ष २०२३ साठी अध्यक्ष म्हणून लातूर मधील विवेकानंद हाॅस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी डाॅ.गौरी कुलकर्णी, सचिव म्हणून लातूर मधील सृजन इव्हेट मॅनेजमेंटचे अमोल बनाळे तर कार्याध्यक्ष म्हणून लातूर मधील प्रसिध्द सि.ए  दिलीप रांदड यांची एकमताने निवड करण्यात आली. 


सन २०२३  ची कार्यकारिणी जानाई चे संघटक अतुल ठोंबरे यांनी जाहीर केली. मनोज सप्तर्षी यांनी ह्या वर्षीचा सांस्कृतिक कार्यक्रम, डाॅक्टर डे, इंजिनिअर्स डे कार्यक्रमच्या नियोजना बद्दल माहिती दिली व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. 
वारसा सांस्कृतीचा जाणीव कृतज्ञची हे ब्रीद घेवून यावर्षी श्री जानाई प्रतिष्ठान आपल्या २३ च्या सांस्कृतिक* कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.

या कार्यक्रमातून जो निधी संकलीत होईल त्यातून *बारा गरजू, हुशार, होतकरू विद्याथांचे अभियांत्रीकी शिक्षण केले जाणार आहे*..
सांस्कृतिक कार्यक्रमातून अभियांत्रीकी शिक्षण हा अभिनव उपक्रम गेल्या  २२ वर्षापासून सातत्याने श्री जानाई प्रतिष्ठान ही संस्था लातूर मध्ये सातत्याने राबवत आहे. या उपक्रमाचा लाभ घेऊन १३५ गरजू विद्यार्थीनी आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे व ते अभियंता झाले आहेत.या बैठकीस जानाई सास्कृतिक मंडळ, अर्थवर्धिनी महिला पतसंस्था, श्री गुरूजी पतसंस्था, श्री गुरूजी आयटीआय चे संचालक व जानाई विद्यार्थी मंडळाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]