लातूर दि.30-03-2022
लातूर शहरातील मजगे नगर भागातील श्री.विठ्ठल रूक्मिनी मंदिर देवस्थानच्या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा पद्मश्री डॉ.अशोकजी कुकडे (काका)यांच्या शुभहस्ते 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वा.गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे लोकप्रिय खा.सुधाकर श्रृंगारे हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते तथा किसान मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, लिनेस क्लबच्या प्रांतपाल तथा श्री.विठ्ठ रूक्मिनी मंदिर समितीच्या सचिव सौ प्रतिभाताई पाटील कव्हेकर, युवा नेते, नगरसेवक, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा श्री.विठ्ठल रूक्मिनी मंदिर समितीचे अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका भाग्यश्री शेळके, सरिता राजगिरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला लातूर शहर व परिसरातील भाविक-भक्तांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री.विठ्ठल रूक्मिनी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष शशिकांत मजगे, कोषाध्यक्ष दिगंबर शेटे, सदस्य ह.भ.प.ज्ञानोबा चाटे, बाबूराव मोठे, सचिन शेंडे पाटील, तुळशिराम कोयले, मोहनराव गंगथडे, प्रकाश शिदे, राजकुमार शेटे, चंद्रकांत वैरागकर, हरीभाऊ मुंढे, नागनाथ चामवाड, उमाकांत उरगुंडे व मन्मथप्पा द्याडे, रणजीत पाटील, लताताई मुद्दे, सुनिता मुचाटे, वनदेवी भातांबे्र, निशीकांत मजगे, डॉ.व्यंकटराव जाधव, शिवराज पोस्ते, जुगलकिशोर सोनी, विलास तेरकर आदींनी केले आहे.




