23.3 C
Pune
Thursday, March 5, 2026
Homeसांस्कृतिकश्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची सांगता

श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची सांगता

श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवाचा शोभेची दारू आतिषबाजीने सांगता

उपविभागीय अधिकारी रोहिणी नºहे यांच्या हस्ते महाआरती

लातूर/प्रतिनिधी : लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून दि. १५ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सव सुरु झाला होता. या महोत्सवाची सांगता दि. २ मार्च रोजी रात्री ८ वाजता शोभेची दारू आतिषबाजीने करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नºहे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे प्रशासन सचिन जांबुतकर यांची उपस्थिती होती.प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने ७३ वा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १५ दिवस विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच बरोबर शेतकºयांसाठीही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी लातूर जिल्ह्यासह परजिल्हा व राज्यातील अनेक भाविक व नागरिक दररोज मोठ्या संख्येने येत होते. सदर यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, प्रदीप राठी, मन्मथप्पा लोखंडे, अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, चंद्रकांत परदेशी, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे आदींनी पुढाकार घेतला होता.

या यात्रा महोत्सवाची सांगता सोमवार दि. २ मार्च रोजी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नºहे यांच्या हस्ते श्रीची महाआरती करण्यात आली. यानंतर मंदीर प्रांगणात शोभेच्या दारूची मनमोहक आतिषबाजी करण्यात आली. यानंतर श्रीची मिरवणूक काढून दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह नायब तहसीलदार सुधीर देशमुख विश्वस्त अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, नरेशकुमार पंड्या,रमेशसिंह बिसेन, व्यंकटेश हालिंगे,विशाल झांबरे आंदीची उपस्थिती होती. सदर यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडल्याबद्दल प्रशासक सचिन जांबुतकर यांनी विश्वस्तांसह शिवभक्त व लातूरकरांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]