22.3 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसामाजिक*संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान खात्यावर जमा*

*संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान खात्यावर जमा*

इचलकरंजी/प्रतिनिधी –
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान खात्यावर जमा झाले आहे. तर मंजूरी मिळूनही जून 2020, फेब्रुवारी 2021 व जुलै 2021 मधील लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले सर्व अनुदान दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात खात्यावर जमा होणार आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कार्यासन अधिकारी प्रशांत वाघ यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश पारीत केले आहेत. या प्रश्‍नी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने लाभार्थ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून निराधारांना दरमहा अनुदान दिले जाते. मागील काही महिन्यांपासून नियमित लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित राहिले होते. तर जून 2020, फेब्रुवारी 2021 आणि जुलै 2021 मधील बैठकीत पात्र असून व मंजूरी मिळूनही हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांच्या मेळाव्यात दिवाळीपूर्वी सर्वच प्रलंबित अनुदान मिळवून देऊन लाभार्थ्यांची दिवाळी गोड करण्याचा शब्द आमदार आवाडे यांनी दिला होता. त्याची पूर्तता यानिमित्ताने झाली आहे. या प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने संपूर्ण राज्यातील लाभार्थ्यांसाठी महत्वापूर्ण निर्णय घेत सुमारे 2400 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार संगांयो लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून लाभार्थ्यांच्या दिवाळीचा गोडवा आणखीन वाढला आहे.


दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी मंगळवारी केडीसीसी बँक शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन लाभार्थ्यांची विचारपूस करत माहिती घेतली. त्याचबरोबर येथून पुढच्या काळात अनुदानात वाढ करण्यासह ते वेळेवर मिळण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे हे प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही दिली. यावेळ प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, राजू बोंद्रे, महेा पाटील, कोंडीबा दवडते, रमेश पाटील, अनिल शिकलगार, राहुल घाट आदी उपस्थित होते.
मागील अडीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश लाभून शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना शासनाने वितरीत केलेल्या अनुदानातून थकबाकीची रक्कम दिवाळीपूर्वी आदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित अनुदान दिवाळीपूर्वी बँक खात्यात जमा होणार आहे. शिवाय पोस्टात खाते काढण्यात आलेल्या लाभार्थ्यांना त्यांना थेट घरात अनुदान पोच होणार असल्याने लाभार्थ्यांनी गडबड व गर्दी करु नये, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]