25.2 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeजनसंपर्क*संजय राजुळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित*

*संजय राजुळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित*

कोरोना योध्दा पुरस्काराने संजय राजुळे यांना सन्मानित
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उमेश खोसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

लातूर ः आजच्या धावपळीच्या युगात कोण काय करतय तर कोण काय करतय हे सर्व चालू असतांना कोणालाच कोणाकडे लक्ष देण्यास वेळ नाही परंतू कांही समाजातील असे घटक आहेत की ते आपल्यावर नजर ठेवून असतात अशाच रितीने लातूरातील साहित्य सारथी कला महोत्सवाच्यावतीने सामाजिक कार्य करणार्‍या मान्यवरांचा शोध घेवून त्यांचा सन्मान कार्यक्रम घेवून त्या कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेवून साहित्य सारथी कला मंचाच्यावतीने त्यांना गौरविण्यात आले.
लातूरातील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिध्द लेखक व इतिहास संशोधक योगेश पाटील(पुणे) व अध्यक्ष म्हणून सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवराज पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, इतिहासकार विवेक सौताडेकर, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, जिजाऊ ब्रिगेडचे सचिव सौ.समाधानताई माने, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे लातूर तालुकाध्यक्ष कमलाकर सुर्यवंशी व औसा तालुकाध्यक्ष मंचक रंडाळे, साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी व सचिव दत्तात्रय परळकर, संतोष सोनवणे, राम रोडगे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमात संजय राजुळे यांनी कोरोना काळाच्या भयावह परिस्थितीत सर्वांना धिर देण्याचे काम केले. त्यांनी लोकांमध्ये जावून कोरोनाविषयीची जनजागृती करून कोरोना रोगाला न भिता सर्व काळजी घेवून कोरोनाशी दोन हात करण्याचा सल्ला दिला. नंतर पुढे कोरोनाची लस भारत सरकारने उपलब्ध झाली. परंतू लोक हे लस घेण्यास भीत होते परंतू तशाही परिस्थिती त्यांनी प्रथम स्वतः लसीकरण करून घेवून लोकात जावून मी लसीकरण केलोय आपणही लसीकरण करून घ्यावे. लसीमुळे कुठलीही आपल्या शरीराला हानी होणार नसुन अशा प्रकारची लोकात जनजागृती त्यांनी यावेळी केली. कोरोनाच्या महाभयंकर दुसर्‍या लाटेत संजय राजुळे यांनी अनेकांना दवाखान्यात बेड मिळत नसतांना बेड उपलब्ध करून दिले. कुठे दवाखान्याचे काम आडत असेल तर त्याठिकाणी जावून डॉक्टरांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रेमडीसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोनाच्या काळात रूग्णांच्या नातेवाईकात तीव्र असंतोष होता अशा प्रसंगी त्या नातेवाईकांना भेटून त्यांना धिर देण्याचे काम संजय राजुळे यांनी केले. कोरोना काळात जे-जे लोक चांगल्या प्रकारे काम करत होते अशा व्यक्तींचा शोध घेवून संजय राजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः कोरोना योध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले व त्यांना कोरोनाच्या लढाईत लढण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम संजय राजुळे यांनी केले त्यामुळेच आज लोकांमध्ये कोरोनाबद्दलची जनजागृती दिसून येत आहे.
याच त्यांच्या कार्याची दखल घेवून साहित्य सारथी कला मंचाच्यावतीने संजय राजुळे यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी सुरेश धोत्रे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष गंगाधर डिगोळे यांनी मानले. याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश परळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]