36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*संजीवनी वनस्पती बेटावर रुग्णांची, पर्यटकांची गर्दी*

*संजीवनी वनस्पती बेटावर रुग्णांची, पर्यटकांची गर्दी*

उत्तरा नक्षत्रास प्रारंभ/वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आणि पर्यटन मंत्र्यांनी सुचना करण्याची गरज

वैभव रेकुळगे,

वडवळ नागनाथ, दि.१६ – देशभरातील एकमेव असे दुर्मिळ वनस्पतीने युक्त असलेले वडवळ नागनाथ येथील संजीवनी वनस्पती बेट हे पर्यटक रुग्ण आयुर्वेद प्रेमिचे मुख्य आकर्षण ठरत आहे. येथील प्रसिद्ध संजीवनी वनस्पती बेटावरील वनस्पती सेवनासाठी शेकडो रुग्ण, पर्यटक उत्तरा नक्षत्रानिमित्त येतात. यंदा उत्तरा नक्षत्रास नुकताच प्रारंभ झाला असून कोरोना काळानंतर प्रथमच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेकडो रुग्ण, पर्यटक या बेटावर दाखल होत आहेत. यामुळे संजिवनी वनस्पती बेटावर रुग्णांची, पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.


यंदा झालेल्या मुबलक पावसाने येथील संजीवनी वनस्पती बेट दुर्मिळ वनस्पतीने बहरले आहे. यंदा या वनस्पती बेटावर उत्तरा नक्षत्रानिमित्त आगळ्या वेगळ्या आयुर्वेद यात्रेला मंगळवार (दि.१३) पासून प्रारंभ झाला असून, ही यात्रा २७ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. विविध आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना या बेटावरील वनस्पती वरदान ठरत असल्याचा अनुभव आहे. उत्तरा नक्षत्रात पंधरा दिवस अनेक रुग्ण, वैद्य, प्राध्यापक, आयुर्वेद विद्यालयाचे विद्यार्थी, भाविक, पर्यटक येवून येथील गुणकारी दुर्मिळ वनस्पतींचा अनुभव घेतला असल्यानेच या बेटावर रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
या बेटावरील वनस्पतीचे तसेच बेटावरील मातीचे आयुर्वेद तज्ञांनी परिक्षण केले आहे. बेटावरील माती ही लालसर रंगाची असून या मातीत लोहाचे ३३ टक्के प्रमाण जास्त असुन या बेटाचा पृष्ठभाग हा समुद्रसपाटिपासुन एक हजार फूट उंचीवर असल्याने येथील हवा शुद्ध असल्यानेच येथील वनस्पती या इतर ठिकाणच्या वनस्पतीहून गुणकारी ठरत असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. या बेटावरील वनस्पतीत उत्तरा नक्षत्रात परिपूर्ण अर्क तयार होतो म्हणूनच उत्तरा नक्षत्रात या संजीवनी बेटावर रुग्णांचा ओढा वाढुन या बेटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे.
या संजीवनी वनस्पती बेटावर अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून येतात. यात प्रामुख्याने राजहंस, निर्मळी, शंखपुष्पी, काळी टाकळी, आडुळसा, गुळवेल, शतावरी, जटाशंकर, अनंतमुळ, सर्पगंधा, सफेद मुसळी, कवचबिज, कोरफड, अरूवद, रानमिरची, भुईकोहळा, पाषाणकंद, मदनफळ, लोखंडी खडकशेपु, यासह एकूण २५९ दुर्मिळ वनस्पती या बेटावर आढळून आलेल्या आहेत. या बेटावर रुग्ण येवून तिन दिवस वास्तव्य करून वनस्पतीचे सेवन करतात व चौथ्या दिवशी काळ्या साळिचा भात शिजवून त्यावर गाईचे तुप उतारा म्हणून खातात आणि ” पत्तों में ही परमात्मा है ” असे म्हणुन आपआपल्या घरी परततात; अशी ही परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे.


वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पर्यटन मंत्री यांनी सुचना करण्याची गरज…

  बेटावरील वनौषधींच्या संवर्धनाबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना, संशोधन केंद्र उभारण्याची गरज आहे. तसेच परिसरातील विविध आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी महिन्यातील एक दिवस बेटावर येवून येथील विविध वनस्पतींचे अभ्यासन, संशोधन करावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सुचना करण्याची खरी गरज आहे.... आयुर्वेद प्रेमी, वडवळ नागनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]