लातूर ; दि.१६-
आज दि.16/03/2022 वार:बुधवार.
95 व्या आखील साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी माझी शाळा, जि.प. प्रा.शाळा बोरगाव काळे. ता.जि.लातूर येथे कथाकारश्री. जी.जी.कांबळे यांनी प्रास्ताविक मांडले. कवयित्री शैलजा कांरडे यांनी सुंदर कविता सादर केली तर कवयित्री तथा कथाकार नयन भादूले राजमाने यांनी छान कथा सादरीकरण केले. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यी. कु. प्रतिभा मिलिंद सोनवणे व चि.वेदांत शंकर ढोले याने अतिशय सुंदर कथा सादर केली. मी विमल मुदाळे गझल सादर केली. विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

हेच संमेलन आपल्या दारी या उपक्रमाचे यश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री साबळे सर हे होते.
श्री.कांबळे सरांनी आभार प्रदर्शन केले.श्री.मोरे सर,श्रीम. यादव मॅडम, सावंत मॅडम, जावळे मॅडम या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

शब्दांकन
श्री.मुदाळे विमलसह. शि.जि.प.प्रा.शाळा.बोरगाव काळे.
ता.ता.जि.लातूर. मो.न.9767758327.




