विरोधकांनी पसरवलेला नरेटिव्ह खोडून काढणार
“संवाद लातूरकरांशी” उपक्रमादरम्यान अजित पाटील कव्हेकर यांचे वक्तव्य
लातूर/प्रतिनिधी : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खोट्या अफवा पसरून विरोधकांनी एक प्रकारचा नरेटीव सेट केला होता, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फटका बसला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा खोडसाळपणा चालू देणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने येत असलेल्या योजना घराघरापर्यंत जाऊन जनसामान्य लोकांना समजावून सांगणार आहोत.

रविवारी (दि.18) सकाळी “संवाद लातूरकरांशी” ही यात्रा काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन घेऊन सुरू झाली. त्यानंतर बोरगावकर क्लासेस समोर विशाल नगर, गगनविहार, शाम नगर,संग्राम नगर, विक्रम नगर, पद्मावती मंदिर या परिसरापर्यंत पोहोचली. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून जनसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना आणल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ गोरगरीब जनतेला मिळवून देण्यासाठी रॅली दरम्यान आम्ही जनजागृती करत आहोत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. आतापर्यंत या योजनेचा लाभ हजारो माता भगिनींना झाला असून, जास्तीत जास्त या योजनेचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.भारतीय जनता पार्टी महिलांचा विचार करते म्हणूनच आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम महिला भगिनींच्या खात्यावर जमा करत असताना गैरप्रकार टाळण्यासाठी महायुती सरकारने जबाबदारी घेतली आणि थेट या योजनेचा लाभ महिला भगिनींपर्यंत पोहोचला.

लातूर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, लातूरकरांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्येकडे इथल्या लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. शहराचे प्रतिनिधी अत्यंत निष्क्रिय असून प्रशासन हे तोंडावर बोट ठेवून गप्प आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिल्यास लातूर शहराचा सर्वांगीण विकास आम्ही करणार आहोत असे त्यांनी सांगिलते.दरम्यान या रॅलीसाठी भा.ज.पा सरचिटणीस दिग्विजय कायवटे जी भा.ज.पा. महिला मोर्चा लातूर शहर अध्यक्षा रागिणी यादव, मंडळ अध्यक्ष आबा चौगुले, संजय गिर, सुभाष ,, नारायण लोखंडे, युवा मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब चौगुले, श्री.हेमंत जाधव ,सतीष ठाकुर, श्री.भरत भोसले, श्री.विजयकुमार कोळी सर, श्री.बोरगावतर जी, श्री.रमेश वसाळे,मंडळ सरचिटणीस लक्ष्मीकांत खरटमोल, विश्वजीत पाटील कव्हेकर, महीला मोर्चा शहर अध्यक्षा जयश्री धूत्तेकर, युवा मोर्चा माजी शहर जिल्हाध्यक्ष गौरव मदने, भाजपा शहर उपाध्यक्ष किशोर जैन, रमाकांत बाराटे, भेटके विमुक्त आघाडी शहर जिल्हाध्यक्ष नवनाथ ढेकरे, अॅड. शीतल पाटील, ऍड. गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोष तिवारी, पंकज देशपांडे, आकाश पितले, मंदार कुलकर्णी, योगेश गंगाणे, हृषिकेश क्षीरसागर, आदित्य आकांगिरे।, अभिजीत उन्हाळे, योगेश झिंजोटे, लक्ष्मण मोरे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.