लातूर..लातूर येथील नागिमे कारंडे यांचे तपस्वी बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सचा भव्य शुभारंभ व सुप्रसिद्ध कवयित्री शैलजा कारंडे यांच्या हे परमप्रिय परपुरुषा!! या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर चे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या शुभहस्ते तर पद्मभूषण आणि विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉक्टर अशोक कुकडे काका यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ कुकडे काकू शिक्षण अधिकारी माननीय तृप्ती अंधारे आणि ज्येष्ठ विधिज्ञ अँड. संजयजी पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून
उपस्थित होते. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सर्व उपस्थित मान्यवरांनी तुळशीला जल अर्पण करून पर्यावरणाचा एक अनोखा संदेश दिला. शैलजा कारंडे यांनी एका सुंदर कवितेतून आपले मनोगत मांडले.
उद्घाटक ह-भ-प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि अन्य संतांचे दाखले देत आपले रसाळ वाणीने सर्वांना मोहित केले. पुस्तकाच्या संदर्भातही
महाराजांनी खूप सुंदर विवेचन केले आणि या अभियंत्याचा बिल्डर चा व्यवसाय भरभराटीत चालावा याकरिता आशीर्वाद दिले.

व्यवसायात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असण्याची गरज ज्येष्ठ विधीज्ञ संजय पांडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली शिक्षण अधिकारी माननीय तृप्ती अंधारे यांनी साहित्यिक शैलीत या काव्यसंग्रहाचा परामर्श घेतला या पुस्तकातील अनेक कवितेचे संदर्भ देऊन स्त्रीचा विविध भावना कशा व्यक्त झाले आहेत हे खूप छान प्रकारे सांगितले
आदरणीय कुकडे काकू यांनी शैलजा माझी मैत्रीण आहे असे गौरवाने सांगून स्त्रीशक्तीचे महात्म्य विराट केले आणि हा काव्यसंग्रह एक आगळा वेगळा आहे हे आवर्जून विषद केले याचे नावही वेगळे सार्थ आहे हे काकूंनी आपल्या भाषणात मांडले.

नागिमे कारंडे या परिवाराचा आपला कौटुंबिक स्नेहसंबंध आहे हे अध्यक्ष पद्मभूषण कुकडे काका यांनी आग्रहाने सांगितले आणि शैलजा हिला मी कन्या मानतो हे सांगून त्यांनी कवितेतील सौंदर्य अचूकपणे सांगितले. शैलजा यांची कविता कशी वेगळी आहे हे सांगताना शैलजा चा दगड-मातीचा व्यवसाय असूनही तिने हे वेगळेपण कसे जपले याचे खुमासदार वर्णन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
या सुंदर आणि भावरम्य अशा सोहळ्याचे प्रतीक सूत्रसंचालन सौ अनघा अंधोरीकर यांनी केले तर आभार विजयकुमार कारंडे यांनी मानले. श्री जनार्दन वंगवाड यांचे विशेष सहकार्य या नियोजनात होते. तसेच भालचंद्र नागरगोजे अजम शेख, वैजनाथ निंगोळे ,बळीराम नागिमे,नामदेव नागिमे आणि शिल्पा कारंडे यांनी हा सोहळा यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली.अभय करंदीकर,नयन राजमाने,सुरेश गीर,नरसिंग इंगळे,डाँ. सरिता मंत्री,सुनिता मोरे,सुलक्षणा सरवदे,वृषाली पाटील, साहित्य व्यवसाय आणि अन्य सर्व थरातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.