– ह.भ.प.डॉ.नामदेवशास्त्री महाराज
लातूर दि.26-03-2023
महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व्यापारात प्रवेश करणार, व्यापार क्षेत्रात उतरणार ही आनंदाची बाब आहे. लातूरच्या राजकीय क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. राजकीय आध्यात्मिक क्षेत्राबरोबर व्यापारात उतरलेल्या आणि संस्कारात वाढलेल्या रंजितसिंह पाटील कव्हेकर परिवाराची पारस टाईल्स आणि ग्रेनाईट लातूर या उद्योग व्यापारातही वृध्दी व्हावी. त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली पारस टाईल्स जगभरात जावी असे प्रतिपादन भगवानगडचे महंत ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.नामदेवशास्त्री सानप यांनी केले.

यावेळी ते पारस टाईल्स आणि ग्रेनाईट उद्योग एफ-14/15, विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलजवळ एम.आय.डी.सी.कळंब रोड, लातूरच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राधाकृष्ण आश्रम, गातेगाव येथील ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज हे होते. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, स्वामी ब्रम्हानंद परमहंस, बालकानंद गिरी महाराज, जिल्हा बँकेचे माजी संचालक नाथसिंह देशमुख, पारस टाईल्स आणि गे्रनाईट उद्योगाचे सर्वेसर्वा रंजितसिंह पाटील कव्हेकर, विश्वजितसिंह पाटील कव्हेकर, दिपक रवी शर्मा, प्रमोदिनीताई पाटील कव्हेकर, जननायक संघटेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोरे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर, काजलताई रंजितसिंह पाटील कव्हेकर, मिराताई पाटील कव्हेकर, गौरचे सरपंच रोहित पाटील, धामणगावचे सरपंच धनराज पाटील, मा.नगरसेविका रागिणीताई यादव, पंकज शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना न्यायाचार्य नामदेशास्त्री सानप म्हणाले, व्यापार्याच्या किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जबाबदारी घेणाराच माणूस पुढे जातो. त्यालाच सुख-दुःख पचविता येतात. त्यातही आपली पुढची पिढीही जबाबदारीने वाटचाल करणारी व्हावी. त्यांचे जीवन सुखरूप जावे यासाठी कव्हेकर परिवाराने सुरू केलेला हा पारस टाईल्स आणि ग्रेनाईट उद्योग असून या माध्यमातून सत्ता, घर, ज्ञान, कमविण्याची तयारी असेल तर जीवनाचे सार्थक होईल असे मतही यावेळी बोलताना न्यायाचार्य नामदेवशास्त्री यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारस टाईल्स आणि ग्रेनाईट,लातूर या उद्योगाचा शुभारंभ फित कापून करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सन्मान कव्हेकर व शर्मा परिवाराच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी मानले. या कार्यक्रमाला लिंबराज सूर्यवंशी, नगरसेवक विशाल जाधव, विरसेन भोसले, एम.एन.एस.बँकचेे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, रविंद्र कांबळे, बालाजी शेळके, संजय गिर, कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, आप्पासाहेब पाटील, संभाजीराव पाटील, बापूसाहेब गोरे, विनोद जाधव, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य सच्चिदानंद जोशी, उपप्राचार्य आशा जोशी, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य शैलेश कचरे, प्रा.डॉ.सतीश यादव, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य संदिप पांचाळ, प्राचार्य मनोज गायकवाड, मुख्याध्यापिका अरूणा कांदे, सुनिता मुचाटे, दिलीप पाटील, राजाभाऊ मुळे, भोसले महाराज, भरत जाजू, महादेव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आ.कव्हेकर हे राजकारणी लोकांमधले साधू आहेत – ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज
कव्हेकर परिवार व शर्मा परिवाराने सुरू केलेल्या पारस टाईल्स आणि ग्रेनाईट उद्योग भरारी निश्चित घेईल हे त्यांच्या शुध्द कर्माचे फळ आहे. त्यांनी जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून 32 युनिट , 1500 कर्मचारी वर्ग नियुक्त करून योग्य नियोजन व कार्यकुशलतेवर त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तसेच सहकार क्षेत्रातही महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची वाटचालही यशस्वी आहे. विवेकानंदाप्रती त्यांची अढळ निष्ठा आहे. सामाजिक, अध्यात्मिक, योगा, प्राणायाम याचबरोबर राजकीय क्षेत्रातही त्यांची वाटचाल यशस्वी आणि गेल्या 18 वर्षापासून त्यांचा आणि माझा सहवास कायम आहे. त्यामुळे खर्या अर्थाने माजी आ.कव्हेकर हे राजकारणी लोकांमधले साधू आहेत. असे प्रतिपादन राधाकृष्ण आश्रम गातेगाव येथील ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज यांनी केले.

अध्यात्माच्या विचारातून आदर्श महाराष्ट्र व भारत निर्माण करण्याचे काम करू
-माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
भगवानगडचे आणि धामनगावचे गेल्या पिढ्यापासूनचे संबंध आहेत. भिमसेन बाबानंतर भगवानगडचे महंत न्यायाचार्य ह.भ.प.डॉ. नामदेवशास्त्री हे भगवानडच्या अध्यात्मिक गादीचा वारसा सांभाळत आहेत. पारस ज्यांच्या आचार विचारात आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पारसाचे सोने होते. अशा पारस टाईल्स आणि ग्रेनाईट,लातूर या उद्योगाचा शुभारंभ नुकताच करण्यात आलेला आहे. त्यांचे पदस्पर्श या भूमिला लाभले हे आमचे भाग्य समजतो. महात्मा बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवराय, स्वामी दयानंद, जैनमुनी प्रमाणसागर यांच्या विचारातून मानव कसा घडावा हे सांगितले आहे. मानसाच्या अंतरंगात त्रिलोकाचे ब्रम्हांड भरलेले आहे. या विचारातूनच राष्ट्र व समाज निर्मितीचे काम आजपर्यंत करीत आलेलो आहोत. स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 साली शिकागो येथील परिषदेत विचार मांडून भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम केलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 वर्षानंतर नवीन सी.बी.सी.एस. शिक्षणपध्दती आणली आणि या शिक्षणाच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व योगाचा शिक्षणात समावेश करण्याचे काम केलेले आहे. ना.मोदींनी केलेल्या या देशाच्या चौफेर प्रगतीमुळे जी-20 अध्यक्षपद भारताला मिळाले. यामुळे प्रगती होणार आहे. जगातील 13 राष्ट्रांनी मोदीजींचा सर्वोच्च पदक देऊन गौरव केलेला आहे. यामध्ये तीन मुस्लीम राष्ट्रांचाही समावेश आहे. त्यामुळे अठराव्या शतकात स्वामी विवेकानंदांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरून 21 व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल. तसेच त्यांनी दिलेल्या अध्यात्माच्या विचारातून आदर्श महाराष्ट्र व भारत निर्माण करण्याचे स्वप्न साकार करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केेले.
———————————————–




