मुंबई दि.15: ईस्त्राईल काँन्सुल जनरल कोब्बी शोशानी यांनी आज दुपारी मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी उपवाणिज्य दुत दालिया नुईमन, विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर, सांस्कृतिक अधिकारी तोर्शा सेन उपस्थित होते.

श्री. देशमुख यावेळी म्हणाले की, येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ईस्त्राईलबरोबर काही सामंजस्य करार करण्यास उत्सुकता दर्शविली. तसेच येणाऱ्या काळात ईस्त्राईल येथील वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम कशा पध्दतीने राबविण्यात येतात, तसेच या अभ्यासक्रमाचा फायदा महाराष्ट्रात कसा होऊ शकेल याबाबत अभ्यास करण्यात येईल असे नमूद केले.
ईस्त्राईल देशातील परंपरा, संस्कृती आणि इतिहास जगप्रसिध्द आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काही सांस्कृतिक महोत्सव कशा पध्दतीने आयोजित करता येतील याबाबत सुध्दा या भेटीदरम्यान चर्चा झाली. या महोत्सवामुळे महाराष्ट्र आणि ईस्त्राईल देशामधील आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांस्कृतिक देवाण घेवाण अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले











