लातूर तालुक्यातील चिकलठाणा सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी
ट्वेंटीवन शुगर लि.चे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट
लातूर ;दि.७
लातूर तालुक्यातील चिखलठाणा येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुक झाली, नुकत्याच झालेल्या या सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित युवा शेतकरी विकास पॅनल विजयी झाले. काँग्रेसप्रणित युवा शेतकरी विकास पॅनलचे पॅन्ल प्रमुखांनी व नवनीर्वाचीत विजयी ऊमेदवारांनी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटीचे व्हाईस चेअरमन व जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन करून पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
