लातूर ः सप्तफेरे वधु वर सुचक केंद्राच्यावतीने आयोजित रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजता स्वानंद मंगल कार्यालय, छत्रपती चौक, लातूर येथे सामाजिक क्षेत्रात हिरहिरीने भाग घेऊन विविध कार्यात मोलाचे योगदान देणार्या कर्तुत्वान, गुणवान सामाजिक कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा गेल्या दहा वर्षापासून करण्याचे कार्य सप्तफेरे वधू वर सूचक केंद्राच्या माध्यमातून केले जाते. त्याचप्रमाणे याही वर्षी सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून .खा.भगवंत खुब्बा केंद्रीय रसायन, खते नवीन आणि नवीकरणीय ऊर्जास्रोत राज्यमंत्री (भारत सरकार) हे उपस्थित असणार आहेत तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.आ.संभाजी पाटील निलंगेकर माजी पालकमंत्री तथा आमदार निलंगा तसेच मा.खा.सुधाकर श्रृंगारे खासदार, लातूर लोकसभा मतदारसंघ. याचबरोबर मा.शा. रमेशअप्पा कराड विधान परिषद आमदार तथा लातूर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश दरडे वैष्णवी एन्डोस्कोपी सेंटर, डॉ. धर्मवीर भारती क्रेडाई, महाराष्ट समन्वय, श्री. नृसिंह घोणे जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ लातूर, प्रा.धोंडीबा आंबेगावे अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, प्रा.प्रेरणाताई होनराव प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा, त्याचबरोबर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून गुरुनाथ मगे लातूर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांची उपस्थिती असणार आहे. यासोबतच या पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्याबद्दल ज्यांचा गौरव करून पुरस्कार दिला जाणार आहे त्यामध्ये श्रीमती.गंधाराबाई सकट-स्वच्छता रत्न पुरस्कार, किशनराव पाटील इंचूरकर-जीवनगौरव पुरस्कार, माऊली ब्लड बँक-आरोग्य रत्न पुरस्कार, साथ फाउंडेशन-सेवारत्न पुरस्कार, अर्पण फाउंडेशन-समाज रत्न पुरस्कार, किरण एस.साकोळे-शिक्षण रत्न पुरस्कार, धनराज परशने-समाज रत्न पुरस्कार, नागनाथ गीते -समाज रत्न पुरस्कार, ड.सुजाता माने(केंद्रे)- नारीरत्न पुरस्कार, आदर्श मैत्री फाऊंडेशन-समाजसेवा रत्न पुरस्कार, अजित फाऊंडेशन-विशेष सेवारत्न पुरस्कार, डॉ.व्यंकटरावजी कोळपुके-साहित्यरत्न पुरस्कार, गोविंद लोखंडे-कोरोंना योद्धा पुरस्कार, माझे लातूर परिवार-लातूर रत्न पुरस्कार या कार्यक्रमात यांचा सन्मान होणार आहे.

तर कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा 2022 चे संयोजक समितीतील श्री उमेश खोसे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,रवीकरण सुर्यवंशी, दत्तात्रेय परळकर, लहुजी शिंदे, बालाजी पिंपळे, गंगाधर डिगोळे, विद्यासागर पाटील, लोमटे सर, ड.जितेंद्र पाटील, जितेंद्र सराफ, पत्रकार अनिल पुरी, रामदास माने, संभाजी तांदळे, भालचंद्र गुरव, योगानंद जोशी, संतोष सोनवणे, मुक्ताई पतसंस्था, देविका शिवपुजे, महादेव मद्दे, सिद्धेश्वर चलवदे, नीता खेडकर, चंद्रकला कासराळे, मंचक रंडाळे, राम मोहिते, गणेश साखरे, बसवराज पटणे, मनोज पटवारी, आदिनाथ कोरे, गुरुनाथ माळेवाडे, राजकुमार चलवा, अजय चलवा, संजय रोडगे, महादेव खिचडी, काकासाहेब गुट्टे, अमोल घायाळ, राम रोडगे, विशाल पाटील, विरभद्र तरगुडे, भगवान सांगवे, शंभू सूर्यवंशी, चेतन पाटील, रामराजे काळे, सुनील ईबीतदार, विष्णुदास कळसे, भागवत भोसले, कैलास शिंदे, दिगंबर सगरे, ब्रह्मानंद आचार्य, प्रदीप आचार्य, रवी गुरदाळे, केशव येदले, सुरेश पवार, तर सूत्रसंचालन साठी गणेश परळे व पल्लवी ताई हाके आदींचे सहकार्य लाभणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती सप्तफेरे वधु-वर सुचक चे संस्थापक संजय राजूळे व संचालक माधव तरगुडे यांनी केलेली आहे.




