*सफरचंद शेतीचा प्रयोग*

0
307

शिरूरअनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील शेतकरी अवलिया किशन कदम यांनी एक एकरात सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वितेकडे…

अनेक शेतकरी उजेडच्या एक एकरातील सफरचंदची पाहणी करण्याकरिता सफर..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-शिरूरअनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील शेतकरी अवलिया किशन कदम यांनी आपल्या एक एकरात विविध जातीच्या सफरचंदचा प्रयोग यशस्विरित्या करित आता सफरचंद फुलोर्‍यात असून ही बाग पाहण्यासाठी कृृषी अधिकारी आणि प्रयोगशील शेतकरी भेटी देत आहेत.
सफरचंद शेतीची लागवड जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश याठिकाणीच लागवडी जास्त प्रमाणात आहेत.माञ,शिरूरअनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील शेतकरी अवलिया किशन कदम यांनी प्रयोगशिल शेती करण्याचे ठरविले आणि त्यात ते सफरचंद लागवडीसाठी त्यांनी आपल्या शेतातील एक एकरात अनेक जातीनुसार शेतीत सफरचंदचा प्रयोग करून तो फुलोर्‍यात आणण्याची किमय या अवलियाने केल्याने त्यांचे नावलौकिक होताना दिसत आहे.त्यांनी मराठवाड्यातील कृृषी विद्यापीठातील शिफारसीनुसार गोल्डन डिलिशियस 20 गुंठ्यात,हर्मन हे 20 व 20 गुंठ्यात असे एकूण एक एकरातील क्षेञफलात एक वर्षांपूर्वी या 400 रोपांची लागवड केली आहे.या लागवडीसाठी योग्य व्यवस्थापन आणि नियोजनाच्या जोरावर ही मज्जल त्यांनी मारली आहे.आजच्या घडीला सफरचंद फुलोर्‍यात आहे तर कांही रोपांना लहान सफरचंद उगवले आहेत.
दरम्यान,अनेक शेतकरी मागील वर्षापासून अत्त्याधुनिक शेतीकडे वळले असून ते पारंपारिक शेतीला फाटा देत बाजारात नवं नवे प्रयोग पाहुन आपली शेतीच्या परपरांगतीला फाटा देत नविन प्रयोगशिल शेतीकडे वळल्याचे चिञ सध्या दिसत आहे.कारण,सततच्या वातावरण बदलानुसार शेती तोटयात जात असल्याने कायम फलबाग लागवडीचे उत्त्पन्न देणार्‍याकडे शेती करण्यात शेतकरी मग्न असल्याचे दिसत आहे.
एकंदर,जम्मू काश्मीर आणि हिमाचलप्रदेश याठिकाणी सफरचंदाचे उत्तम उत्त्पन्न निघते त्यानुसारचं शेतकरी अवलिया किशन कदम यांनी प्रयोगशिल शेतीकडे आपले पाय कणखर केल्याने हा प्रयोग यशस्वितेकडे वाटचाल करित असल्याचे दिसत आहे.परिसरातील शेतकर्‍यांने प्रयोग करण्यास हारकत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

———————————————————————
शेतकर्‍यांननी फळबाग लागवडीकडे वळावे…!

अत्त्याधुनिक पध्दतीने शेती करणे ही काळाची गरज बनली असून शेतात वेगवेगळे प्रयोग करून फळबाग लागवड विकसित करणे आवश्यक असल्याचे पाहणी दरम्यान शिरूरअनंतपाळ तालुका कृृषी अधिकारी संजय नाबदे,मंकृअ बी.एस.गाढवे,आत्माचे बी.यू.तिवडे,कृृस डी.एस.काळे,राहुल जाधव यांनी सांगितले.
———————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here