“समाजभूषण” बदलत्या समाजाचे यथार्थ चित्रण
– महसूलमंत्री
संगमनेर…”समाजभूषण “पुस्तक हे बदलत्या समाजाचे यथार्थ चित्रण आहे,असे गौरवोद्गार राज्याचे महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच काढले.या पुस्तकाचे लेखक,संगमनेर जन्मस्थान असलेले श्री देवेंद्र भुजबळ यांनी संगमनेर येथून ८ वेळा विधानसभा निवडणूक जिंकून विक्रम प्रस्थापित करणारे नामदार बाळासाहेब थोरात यांना नुकतेच संगमनेर येथे समाजभूषण पुस्तक भेट दिले,त्या प्रसंगी पुस्तक चाळून त्यांनी ज्या समाजातील व्यक्ती शिकत आहेत,नवे काही करण्याचे धाडस करीत आहेत ,त्या निश्चितच यशस्वी झाल्या आहेत असे सांगून आजच्या काळात शिक्षण आणि धाडस हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,असे सांगितले.
प्रारंभी लेखक देवेंद्र भुजबळ यांनीं पुस्तकाची माहिती देऊन त्याचे वेगळेपण स्पष्ट केले. तसेच नामदारांनी त्यांच्या अत्यन्त व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढल्या बद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ संतोष खेडलेकर, निवृत्त उपमुख्य दक्षता अधिकारी अशोक कुंदप, गोरख सोमनाथशेठ रासने आदी मान्यवर उपस्थित होते.











