*सरकारची अंत्ययात्रा*

0
495

…तर सरकारचे श्राद्ध घालणार, आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांचा इशारा

निलंग्यात महाविकास आघाडी सरकारची अंत्ययाञा...

निलंगा/प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत केवळ वसूली करण्याचे काम केले आहे आता ही वसूली तुटपूंजे अनुदान देवून ती महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यां कडून होत आहे माञ अधीच खरीप मोसम हातातून गेल्याने अडचणीत आलेला शेतकरी सरकारी वसूली धोरणामुळे रब्बीचा पेरा करू शकणार नाही पाणी असूनही रबी चा पेरा करता येत नसल्यामुळे आगामी दहा दिवसात शेतकऱ्याचे वीज कनेक्शन पूर्ववत न केल्यास सरकारचे श्राद्ध घालू असा इशार आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला.

भारतीय जणता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या महावितरण विभागाने शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्यासाठी व ट्राँसफार्मर जळाल्यानंतर पैसे भरा तरच ट्राँसफार्मर मिळेल अशा शेतकरी विरोधी फतव्याचा निषेध करत माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत तब्बल तीन तास महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययाञा काढत निषेध नोंदवला…

येथील शिवाजी चौकात महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक तिरडी तयार करण्यात आली होती.या प्रतिकात्मक तिरडीला स्वतः मा. मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा जिल्हा अध्यक्ष रमेश कराड यानी शेवट पर्यंत खांदा दिला होता.अंत्ययाञेसमोर गाडग्याचे शिंंकाळे धरून हुबेहूब एक शेतकरी शोकाकूल अवस्थेत चालत होता.निलंगा मतदार संघातील अनेक गावातील शेतकरी उलटी हलगी वाजवत या अंत्ययाञेत सामील झाले होते.शहरातील शिवाजी चौकातून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकरी तहसिल कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यासाठी गेले माञ तेथे निलंगा पोलिस अधिकाऱ्यांनी सदरील प्रतिकात्मक पुतळा व तिरडी ताब्यात घेऊन अंत्यविधी करू दिला नाही.

यावेळी अयोजित प्रतिकात्मक शोकसभेत बोलताना निलंगेकर म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अगोदरच अतिवृष्टीच्या संकटात होरपळणा-या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजु मदत जाहीर केली असून ही मदत केवळ ७५% प्रमाणे दिली जात आहे.त्यामध्येच तीन व पाच एच.पी.पर्यंत पंचविस हजार रूपये जळालेल्या ट्राँसफार्मरसाठी भरा तरच शेतकऱ्यांना ट्राँसफार्मर मिळेल असा आदेश राज्य शासनाने काढला आहे.अतिवृष्टीच्या माध्यमातून तुटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना द्यायचे आणि ट्राँसफार्मरच्या माध्यमातून वसूल करायचे असे हे वसूली सरकार आसून अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे खरीप हंगाम वाया गेले आहे.आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर असताना महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप निलंगेकर यानी केला आहे.

यावेळी आमदार रमेश कराडे म्हणाले लातूरचे पालकमंञी दाखवा आणि दोन हजार मिळवा असा अरोप करून त्यानी पालकमंञी अमित देशमुख यांच्यावर सडकून टीका केली तसेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वा-यावर सोडून सत्तेची मस्ती डोक्यात शिरलेले सर्वच मंञी शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाच फोडू शकत नाहीत तसेच जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपा उमेदवाराचे अर्ज वैध ठरल्यामुळे ते लातूरला येत नाहीत.असो अरोप कराड यानी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here