*सरसकट शाळा बंद चुकीचे*
सरसकट शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असे वाटते. शिफ्ट (पाळी पद्धत)नुसार,आठवड्यातून दोनदा तरी विद्यार्थ्यांना बोलावले पाहिजे.रोज थोडे विद्यार्थी तरी शाळेत आले पाहिजेत.जवळपास दोन वर्षे शाळा बंद करणे योग्य वाटत नाही.शाळा चालू केल्या आणि लगेच दिवाळीच्या सुट्टया दिल्यात.आता पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत.तोपर्यंत कोरोणा सुट्टी.दुसरीकडे दहावी, बारावी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ अथवा न होऊ परीक्षा वेळेवरच घेणार हे बोर्डाच्या आध्यक्ष यांनी जाहीर केले आहे.लाखो शिक्षक सुट्टी मुळे घरी आहेत.शाळेत आले तरी मुले नाहीत.ऑनलाईन पद्धतीने शिक्षण विद्यालय पातळीवर होऊ शकत नाही.ग्रामीण भागात सर्व विद्यार्थी आधुनिक मोबाईल सह असतील असे नाही. इंटरनेट सुविधा नसतात.शाळा चालू झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

योगासन,खेळ,संगीत,. वक्तृत्व,व्यक्तिमत्त्व विकास यासाठी कोरोनाची काळजी घेऊन टप्प्याटप्प्याने हे सगळे करता येते.वर्ग खोल्यात न बसता अंतर ठेऊन प्रार्थना मैदानात बसले तरी चालेल. सहाशे दिवस सुट्टी घेल्यावर पुन्हा उन्हाळा सुट्टी द्यावी काय यावर निर्णय झाला पाहिजे.रविवार पूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांचे हित जपले पाहिजे.ज्या गावात कोरोना नाही तेथे प्रथम आपण या निर्णयास आवलंबिले पाहिजे.ही पोस्ट शासन,प्रशासन,पालक,समाजसेवक,पत्रकार या सर्वापर्यंत जाऊ द्या हा माझा आग्रह राहील.हे सर्व करताना विद्यार्थ्यांची काळजी केलीच पाहिजे.१) विद्यार्थी वाहतूक सार्वजनिक न वापरता पालकांनी जवाबदारी घेतली पाहिजे.२)मास्क, स्यानिटायजेर, स्वच्छता, योग्य अंतर याचे पालन केले पाहिजे. आपघात होऊ नये याची काळजी घ्यावी पण म्हणून कोणी वाहन चालवणे सोडीत नाही.तसे थेट शाळा काळजी घेऊन चालू कराव्यात यासाठी हे निवेदन मी मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,शिक्षण आयुक्त,सह सर्व संबंधितांना पाठवीत आहे.कृपया आपणही ही पोस्ट जास्तीत जास्त पाठवावी ही विनंती.

.डॉ.जगन्नाथ शामराव पाटील
लातूर ७५८८३८७५९४.
(लेखक हे संस्थाचालक, लेखक, संपादक आहेत)












