*टीम रत्नागिरी.. आम्हाला आपला अभिमान आहे*…
पत्रकारांच्या नावानं कोणी कितीही नाकं मोडू द्या, आजही पत्रकारांना सामाजिक बांधिलकीचा विसर पडलेला नाही.. आपण समाजाचं काही देणं लागतो ही जाणीव तर मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक सदस्यांत आहेच.. समाज अडचणीत असेल तर आपण केवळ बातम्या देत बसू शकत नाही.. लोकांची दु:ख, वेदना जगाच्या वेशिवर टांगणं हे तर आमचं कामच आहे पण अडचणीत सापडलेलयांना शक्य तेवढी मदत करणं हे देखील आम्ही आमचं कर्तव्य समजतो.. ही जाणीव ठेवूनच मराठी पत्रकार परिषदेच्या महिला संघटक जान्हवी पाटील आणि रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत वणजू यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी परिषदेचे एक पथक आज मदत साहित्य घेऊन चिपळूणला पोहोचलं.. कोकणातील पुणं अशी ओळख गौरवानं मिरवणार चिपळूण होत्याचं नव्हतं झालं आहे. हजारो संसार उध्वस्त झाले आहेत.. त्यांना थोडी का होईना मदत झाली पाहिजे या जाणिवेतून आमचे रत्नागिरीचे मित्र पाणी बॉटल्स आणि इतर काही जीवनावश्यक वस्तू घेऊन आज चिपळूणला पोहोचले.. मला माहितंय आभाळ फाटलंय.. आमची मदत फारच तुटपुंजी आहे.. पण आमच्या भावना महत्वाच्या आहेत..जान्हवी, हेमंतजी आणि अन्य सर्व पत्रकार मित्र.. आपल्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे..












