जैवविविधता जोपासण्यासाठी सह्याद्री देवराईचे आवाहन तसेच वृक्ष साक्षरता व पर्यावरण साक्षरता शिबिर संपन्न
लातूर जिल्हा विस्तीर्ण असा पठाराचा भाग, चारीही बाजूंनी उंचवटा असणारा पठार आणि मध्यभागी कारेपुर या रेणापूर, चाकुर व उदगीर हा निसर्गरम्य असा डोंगर लाभलेल्या भागातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी सह्याद्री देवराई लातूर च्या सहका-यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
उत्तरा नक्षत्रात चाकुरचे डोंगर जैव विविधतेने नटलेले असतात. या परीसरात तीन वर्षांपासून सह्याद्री देवराई लातूर ची सुरुवात झाली. आज येथे ६० पेक्षा जास्त प्रजातींचे दुर्मिळ २७ हजार वृक्ष पावसाच्या पाण्यावर जगवलेली आहेत. आता उत्तरा नक्षत्रात संजीवनी वनस्पती बेटावर भारतातील वैद्य निसर्गप्रेमी भेट देतात. त्यापूर्वी येथील जैवविविधता समजावी समजवून घ्यावी यासाठी एका शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.



या डोंगरावर व डोंगर किनारी अधिवास असलेल्या पक्षी, कीटक, तलावातील माशांचे संवर्धन व्हावे यासाठी जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
लातूर जिल्हयाच्या एका बाजूला विस्तीर्ण पठार तर दुसऱ्या बाजूला निसर्गरम्य डोंगर परिसर आहे. या डोंगरांचा काही भाग या परिसरातील डोंगररागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जैवविविधता आढळून येते. मात्र, शहरे व तालुक्यातील भागात होणारी बांधकामे त्यामुळे जैव सृष्टीची कत्तल, डोंगर उत्खनन व मोठमोठे रस्ते या गोष्टींमुळे ही जीवसृष्टी संकटात सापडल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी अनेक वर्षांपासून करत आहेत.
या साठी या बालाघाट क्षेत्रातील जैवविविधतांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग, शिबिरांचे आयोजन करण्याचा निश्चय सह्याद्री देवराई लातूर समन्वय समितीने घेतला आहे.

जिल्ह्यातील जैविक साधनसंपत्तीचे संवर्धन व्हावे आणि ती निरंतनपणे टिकून राहील यासाठी संजीवनी वनस्पती बेट येथे सह्याद्री देवराई लातूर यांच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनी निसर्गप्रेमी यांची वृक्ष साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता ही मोहीम राबविण्यात आली.
सह्याद्री देवराई लातूर यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वन विभाग, ग्रामपंचायत वडवळ नागनाथ, छत्रपती राजश्री शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी , निसर्ग प्रेमी हे सहभागी झाले.
उत्तरा नक्षत्रा मध्ये भारतभरातून या बेटावर अनेक वैद्य ,निसर्गप्रेमी भेट देतात व येथे वास्तव्यास राहतात.
या काळात प्लास्टिक कॅरीबॅग ,प्लास्टिक बॉटल हे इतरत्र टाकू नये असे आवाहन करणारे माहिती भिंती पत्रक अनावरण करण्यात आले.
संजीवनी वर बेटावर असलेल्या प्लास्टिक बॉटल , व्हेपर्सची प्लास्टिक कव्हर ,कॅरीबॅग अश्या तीस पोते भरून हा प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
नंतर या बेटावर असलेल्या सर्व वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या सर्व दुर्मिळ वनस्पतींचे बीज संकलन करून सह्याद्री देवराई यांच्यातर्फे शासकीय रोपवाटिका येथे दुर्मिळ रोपे तयार करण्यात सुरुवात करण्यात आली. हे सर्व कार्य सह्याद्री देवराई तर्फे शिवशंकर चापुले पाहत आहेत.
तसेच या शिबिराच्या निमित्ताने काही दुर्मिळ वृक्ष प्रजातींचे रोपं या बेटावर रोपण करण्यात आले.सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत श्रमदानाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.
उपस्थित सर्व विद्यार्थी शिबिरार्थींना सह्याद्री देवराई चे प्रमुख मराठी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी संपर्क साधून सगळ्यांशी संवाद साधला. अनपेक्षितरीत्या सयाजी शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्याशी बोलून त्यांना प्रोत्साहन दिले . प्रत्येकाला त्यांचे नाव त्यांची आवड विचारली त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा फार उत्साह वाढला.
दुपारी नंतर येथे प्रचंड मोठ्या पावसाला सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी बेटावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला तीन तासात जवळपास 80 ते 90 मिलिमीटर पाऊस या परिसरात पडला. अश्या निसर्गमय वातावरणात या शिबिराची सांगता ही निसर्गावर आधारित काव्य आणि कविता करून करण्यात आली.
कवी अरविंद जगताप यांची प्रेरणा देणारी कविता ” झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे” ही कविता समूहाने एकत्र म्हणण्यात आली.
या जैवविविधता शिबिराचे आयोजन सह्याद्री देवराई लातूर तर्फे करण्यात आले. सह्याद्री देवराई तर्फे शिवशंकर चापुले यांनी सर्व शिबिराची व्यवस्था बघितली .
या वृक्ष साक्षरता, जैव साक्षरता शिबिरास श्री. बालाजी गंदगे ऊपसरपंच – वडवळ ना., श्री. सुपर्ण जगताप (जिल्हा समन्वयक- सह्याद्री देवराई, लातूर), श्री. शिवशंकर चापूले(सह्याद्री देवराई, लातुर),
प्रा विजयकुमार गवळी, प्रा सोमदेव शिंदे,श्री. वैभव रेकूळगे, श्री. संतोष आचवले, श्री. सतिश शिंदे, श्री. हणमंत बरले, व विद्यार्थी , विदयार्थीनी, निसर्ग प्रेमी उपस्थित होते.











