या मागणीसाठी इचलकरंजी येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने
प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी साधूंवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन झालेच पाहिजे, साधूओंके सम्मान में, बजरंग दल मैदान में आदी घोषणा देत या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला.यावेळी शिष्टमंडळाचे शिरस्तेदार संजय काटकर यांनी निवेदन स्वीकारले.
इचलकरंजी ( प्रतिनिधी ) –
सांगली जिल्ह्यातील लवंगा उमदी येथे ४ साधूंना जमाव करून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना पालघर साधू हत्याकांडाशी साधर्म्य दर्शवणारी आहे. मुले पळवणा-या टोळीच्या नावाखाली हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी व सर्वोच्च श्रद्धा असणाऱ्या साधूसंतांना प्रताडीत करून हिंदूंचे मनोबल खच्चीकरण करण्याचे हे सुनियोजित षडयंत्र आहे,
असा आरोप विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केला आहे.
तसेच साधूंना मारहाण करणाऱ्या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी त्वरित पावले उचलावीत व साधूंना योग्य न्याय द्यावा, अन्यथा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.तसेच शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांना सादर केले.
या निदर्शनात बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, सोमेश्वर वाघमोडे, अनुप हल्याळकर, मुकेश दायमा, रावसाहेब चौगुले, संदीप जाधव, अनिल सातपुते, मुकुंदराज उरूणकर, प्रताप घोरपडे, भीमराव कोकणे अनिकेत रोकडे, अमित कुंभार, सर्जेराव कुंभार, मुकेश चोथे, संदीप देवरे, तन्मय गुरव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.