*साई क्रीटीकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातुन माफक दरात रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळाव्यात*
बी. पी. शुगर आजार नव्हे बिघाड.
निलंगा येथील साई क्रीटी केअर हॉस्पिटलचा शुभारंभ..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम हाती घेवून साखळी निर्माण केली असून या साखळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कमी खर्चात अत्यावश्यक सर्वच उपचार मिळू शकतात या ग्रुपमध्ये नामांकित डॉक्टर सुसंस्कृत घराण्यातील लोक असून लातूर नंतर निलंगा शहरात आरोग्य सेवा देणारे हे हॉस्पीटल व्हावे अशी अपेक्षा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले ते निलंगा येथील साई क्री टी केअर हॉस्पिटलचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके, डॉ हणमंत किणीकर, लिंबन रेशमे महाराज, उपजिल्हाधिकारी सौ शोभा जाधव, डॉ अरविंद भातांब्रे, डॉ राजशेखर मेनगुले , साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, माजी जि. प. अध्यक्ष पंडितराव धुमाळ, विजयकुमार पाटील, संभाजी सुळ, हारिराम कुलकर्णी, संभाजी सुळ, संभाजी रेड्डी, आबासाहेब पाटील व्यासपिठावर उपस्थित होते.
पुढें बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की सेवावृत्तीचे डॉक्टर मंडळी आपापल्या पद्धतीने क्षेत्रात कार्यरत असताना ग्रामीण भागातील लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत असून त्यामूळे लोकाना सहजपणे आरोग्याची सुविधा देणारे हे हॉस्पीटल व्हावे अशी अपेक्षा करून डॉक्टरांनी नावलौकिक मिळवला त्याप्रमाणे इथे सेवा देण्याचा प्रयत्न करतील शक्य असल्यास आपल्याला अडचण पडल्यास आम्ही आपल्याला मदत करून असे सांगून निलंगा शहरातील अनेक डॉक्टर चांगल्या प्रकारे लोकांची आरोग्याची सेवा देतात त्यामूळे ही स्पर्धा नाही अधिक जलदपणे अत्याधुनि क सेवा देण्याच्या मानस या क्री टी केअर हॉस्पिटलचा मधून होईल त्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचा ३प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे असे ते यावेळी म्हणाले.
*जिल्हा बँकेकडून १२०० कोटी रुपये बिनव्याजी पिक कर्ज वाटप करणार*
यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात सर्वात आगोदर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला राज्यातील अनेक जिल्हयात चर्चा सुरू झाली लातूर देतात तुम्ही का नाही स्पर्धा सुरू झाली आम्ही सुरू केली योजना आता राज्यात सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत असे सांगून लातूर बँक पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज वाटप लवकर सुरु करेल यावर पाच लोकांची कमेटी अभ्यास करून तो अहवाल सादर करेल त्यानंतर तातडीने कर्ज वाटपाला सुरवात होईल यामधे कुठलेही राजकारण, जात पात, धर्म, याकडे न बघता सर्वांना बँक पिक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिलीपराव देशमुख यांनी बोलताना दिली
*पेशंट दुरुस्त होऊन घरी जावा चांगल्या सुविधा मिळाव्यात*
हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना हभप गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की या वास्तूचा शुभारंभ अध्यात्मिक, समाजकारण, राजकारण, वास्तुशास्त्र संपादन असलेले विकासाच्या नव्या वाटेवर घेवून जाणारे व्यक्तिमत्व असलेले माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ झाल्याने यात यश मिळेल च यात शंका नाही अशा शु भेच्छा देवुन देशमुख कुटुंबांनी नेहमी सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे आजही सुरूच आहे असे सांगून*लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लोक डोळे मिटून मतदान करतील*येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा लोक डोळे मिटून मतदान करतील अशी भावना त्यानी व्यक्त करून सहकाराचा गाडा दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृ्त्वाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर ही देशात पहील्या स्थानावर झेप घेतली आहे हे खरोखरच आपल भाग्य आहे असेही ते म्हणाले.
यावेळी, सोनू डगवाले, माजी सभापती मधुकर पाटील, सुधाकर पाटील, सतिश पाटील, आबासाहेब पाटील, अजित निंबाळकर, पंकज शेळके, हमीद शेख, अँड नारायण सोमवंशी, श्रीकांत साळुंके, डॉ लालासाहेब देशमुख, डॉ तली खेडकर, डॉ तात्यासाहेब देशमुख, डॉ बलभीम सूर्यवंशी, शकिल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अरविंद भाताब्रे यांनी तर डॉ हणमंत किणीकर, अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन ओमप्रकाश झुरुळे यांनी तर आभार प्रदर्शन सोनु डगवाले यांनी मांडले.











