39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeकृषीसाखर कारखान्यास सदिच्छा भेट

साखर कारखान्यास सदिच्छा भेट

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यास अभ्यास गट सदस्यांची सदिच्छा भेट

लातूर; दि.११

ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणी केल्यास येणा-या पाचटाच्या वजना बाबत अहवाल तयार करण्यासाठी साखर आयुक्तानी अभ्यास गट नियुक्त केला आहे. सदरील अभ्यास गटाचा २०२१/२२ हंगामातील राज्य अभ्यास दौरा सुरू असून, सदरील अभ्यास गटाच्या सदस्यांनी दि. ११/०२/२०२२ रोजी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली.तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील आलमला ता.औसा जि.लातूर येथील श्री.वीरनाथ चरकपल्ले, काशीनाथ चरकपल्ले,राम चरकपल्ले या शेतक-यांच्या प्लाॅटला भेट देऊन ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणी केलेल्या ऊसाचे,प्रत्यक्ष वजन करून त्यामधील वाढे, पाचट व मातीचे मोजमाप केले.
या अभ्यास गटात सर्वश्री पांडुरंग शेळके, सह संचालक (विकास) साखर आयुक्तालय, पुणे, प्रा. पी. पी.शिंदे,शास्त्रज्ञ व्हीएसआय पुणे, नेताजी पवार, डीएसटीए पुणे, मानसिंग तावरे, जीएम, अंबालिका शुगर, कर्जत, जि. अ.नगर, पांडुरंग आवाड, कृषी भुषण शेतकरी (ऊस तज्ञ) आवाड शिरपूरा ता. कळंब, अजित चैगुले, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो., पुणे, तसेच न्यू हाॅलंड व शक्तीमान हार्वेस्टर कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

यावेळी मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, अशोकराव काळे, अध्यक्ष ऊस विकास व ऊस पुरवठा समिती तसेच सदर समितीचे सदस्य, संचालक सर्वश्री तात्यासाहेब देशमुख, वसंतराव उफाडे, बंकटराव कदम, सदाशिवराव कदम, अनिल दरकसे, धनराज दाताळ, ज्ञानेश्वर भिसे व सचिन दाताळ,कार्यकारी संचालक श्री.जितेंद्र रणवरे, जागृती शुगरचे प्रकल्प व्यवस्थापक,सुनिल देशमुख,रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, ट्वेन्टी वन शुगरचे व्हा.प्रेसीडेंन्ट समिर सलगर, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख,शेतकी अधिकारी, आर.ए. जाधव, खाते प्रमुख आदिंची उपस्थिती होती.
अभ्यास गटातील मान्यवर सदस्यांचा कारखान्याच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. पांडुरंग शेळके, सह संचालक (विकास) साखर आयुक्तालय, पुणे, आपल्या मनोगतात म्हणाले की, लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात मराठवाडयात मांजरा परिवारातील साखर कारखान्यानी आपल्या यशस्वी वाटचालीतून अमुलाग्र बदल शेतक-यांच्या जिवनात घडवला, त्यामुळे येथील अर्थकारणास बळकटी मिळाली असून, साखर उद्योगात मांजरा परिवातील सर्व कारखान्यानी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. अशा शब्दात त्यांनी गौरव केला.
यावेळी आभाराते मनोगत व्यक्त करताना व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे यानी मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामिणचे आ. धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सुरू असलेल्या मांजरा कारखान्याच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी प्रास्ताविक कार्यकारी संचालक श्री.जितेंद्र रणवरे यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]