23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसंगीतसाधी राहणी उच्च विचारसरणी

साधी राहणी उच्च विचारसरणी

श्रद्धांजली


मंगेशकर कुटुंब म्हटले की फक्त आणी फक्त संगीत व गीत या पलीकडे पण यांचे कार्य आहे. पुण्या मध्ये त्या काळी मराठी माणसाचे एक चांगले रुग्णालय असावे हा विचार तात्कालिन कॅन्सर सर्जन डॅा धनंजय केळकर यांनी लता दिदी समोर मांडला व लता दिदीनी लागलीच होकार दिला.आणी २००२ साली दिनानाथ मंगेशकर रुग्णालय रुग्ण सेवे साठी सज्ज झाले .हे रुग्णालय उभारताना बराच त्रास सहन करावा लागला मंगेशकर कुटुंबाने आर्थिक मदत केल्यामुळे रुग्णालय ऊभा राहीले.

या रुग्णालयात मी ,डॅा राजहंस, डॅा समीर जोग,डॅा जयश्री लवाना,डॅा समीर साठे,डॅा बापट,यांच्या सोबत अतिदक्षता विभागात काम केले,काम करत असताना बरयाच वेळा ताई,व मंगेशकर कुटुंब रुग्णालयाला भेट देत पण मालकी भाव कधीच दिसुन आला नाही की कुठला गर्व दिसला नाही.२००३ साली जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना असेल मी सकाळी अतिदक्षता विभागात ड्युटीवर असताना डॅा राजहंस यांच्या आदेशावरून लता दिदीना त्यांच्या घरुन दिनानाथ रुग्णालय येथे आणुन यशस्वी पणे ऊपचार केला होता ,तो ह्रदयविकाराचा झटकाच होता . त्यावेळी त्यांना ऊपचार करत असताना एक भीती,दडपण व आदर पण होता पण त्यांच्या वर्तनावरुन कधी मोठेपणाचा आव दिसुन आला नाही. अशी माणसे व त्यांचा सहवास म्हणजे मी माझे भाग्य समजतो .त्याच्या निधनाने देशाची व संगीत क्षेत्राचीच नव्हे तर आरोग्य क्षेत्राची पण हाणी झाली आहे.


डॅा रमेश भराटे
ह्रदयरोग व श्वसनविकार तज्ञ
गायत्री हॅास्पीटल लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]