लातूर दि. ३० – येथील सामुदायिक दसरा महोत्सवाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या निमित्ताने महर्षी दयानंद व्यायाम व क्रीडा मंडळ, अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि अ.भा. नाट्यपरिषद, शाखा लातूर च्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी २ ऑक्टोबर २०२२ रोजी नि:शुल्क दांडिया- गरबा रास नाईट कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या सुवर्ण वर्षाचे औचित्य साधून यंदा शहर व ग्रामीण समाजबांधवांच्या सहभागातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसह सामूहिक दसरा जल्लोषात साजरा करण्याची लातूरची प्रथा परंपरा जपली जाणार आहे. महोत्सवात रंगणारा गरबा आणि दांडिया ही आपली सांस्कृतिक विरासत अनुभवण्याची मित्रमैत्रिणींसह खेळण्याची अपूर्व संधी तरुणाईला लाभणार आहे.

लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालय सभागृहात (पीव्हीआर सिनेमा जवळ, एमआयडीसी) येथे बुधवारी दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ४ ते रात्री ९.३० ह्या वेळेत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरचे खा. सुधाकरजी शृंगारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, प्रदीप पाटील खंडापूरकर, ईश्वर बाहेती, महोत्सवाचे मुख्य संयोजक श्रीकांत रांजणकर, उपाध्यक्ष जयप्रकाश दगडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या नि:शुल्क दांडिया- गरबा कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपली नावे महोत्सवाच्या ग्रामीण विभागाचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा (मो. ८८८८१८४४४४), शहराध्यक्ष ईश्वरचंद्र बाहेती (मातोश्री मेडिकल, नाना-नानी पार्क समोर ९४२२०७१७४४), वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत रांजणकर (हत्तेनगर, ९८३४७०६०३४), व्यंकटेश हालिंगे (९४०४१६३००४) यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे बाहेती यांनी सांगितले .या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्सुक असून लातूरमधील सुप्रसिद्ध सुपरस्टार छोटू हिबारे यांच्या झिंग आणणाऱ्या डीजे संगीत व गाण्यांच्या ठेक्यावर थिरकण्याची मोफत संधी सुवर्ण महोत्सवी सामुदायिक दसरा महोत्सव समितीने उपलब्ध करुन दिली आहे.




