निलंगा तालुक्यातील निटूर व मसलगा येथे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम जपत इफ्तार पार्टी संपन्न..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
निलंगा तालुक्यातील मुगाव येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी निटूर व मसलगा जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना भव्य इफ्तार पार्टी देण्यात आले.

मुगाव येथील अशोक शिंदे माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.तसेच राजकीय व सामाजिक उपक्रमाव्दारे निटूर परिसरात अध्यात्मिकतेला खुप महत्त्व देणारे म्हणून ओळख आसे त्यानुसार त्यांची ख्याती सामाजिक संकल्पना जोपासण्यासाठी दानत्त्व हेच श्रेष्ठत्त्व असल्याचे त्यांनी नमुद केले.त्यामुळे मला आत्मिक समाधान लाभते असेही सांगितले.
याप्रसंगी,उपसरपंच संगमेश्वर करंजे,इब्राहिम साॅंब,स्वियसहायक दत्ता शिंदे,सतिष शिंदे,राजकुमार सोनी,अरूण सूर्यवंशी,निसार शेख,जलील शेख,अहमद गस्ते,करीम येरोळे,मिनाज शेख,बिलाल शेख,हैदर मोमीन,खाॅंजा मुल्ला,ताहेर गस्ते,गणी शेख,आतिक शेख आदी जणांची उपस्थिती होती.




