● आ.अभिमन्यु पवारांच्या हस्ते प्रवेशिका विक्रीचा शुभारंभ
● प्रा.शिवराज मोटेगाकर यांच्या हस्ते प्रवेशिकेचे प्रकाशन.
लातूर :
जानाई विद्यार्थी मंडळाने प्रशांत दामले व वर्षा उजगांवकर यांच्या प्रमुख भुमीका असलेले ” सारखं कांहीतरी होतय ” या नाटकाचे आयोजन १३ ऑक्टोबर रोजी सायं ७ वा मार्केट यार्ड सभागृहात केले आहे.
नाटकाच्या प्रवेशिका विक्रीचा शुभारंभ औश्याचे आमदार अभिमन्युजी पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. त्यापूर्वी आरसीचे संचालक प्रा.शिवराजजी मोटेगांवकर सरांच्या हस्ते नाटकाच्या प्रवेशिकेचे व नाटकाच्या पोष्टरचे प्रकाशन
करण्यात आले. यावेळी डाॅ.वैशाली टेकाळे, प्रा.दत्तात्रेय मुंढे, डाॅ.मनोज शिरूरे, डाॅ. अभिजित मुगळीकर, अभि.अतुल ठोंबरे , सारंग अयाचित, समर्थ कुलकर्णी,अवंतीका प्रयाग, रेणू पाटील उपस्थित होते.

श्री जानाई प्रतिष्ठानने मागील २२ वर्षात २२ संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले यातून जो निधी संकलीत झाला त्यातून १३५ विद्यार्थ्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले व ते अभियंते झाले.
या नाटकाच्या आयोजनातून जो निधी संकलीत होईल त्या निधितून आकरा गरजू हुशार होतकरू विद्यार्थ्याची अभियांत्रिकी महाविदयालयाची प्रवेश शुुल्क भरली जाणार आहे.

या नाटकाच्या प्रवेशिका घेऊन सर्वांनी नाटकास उपस्थित राहुन गरजू हुशार होतकरू अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॅा.ऋजुता अयाचित,प्रसाद उदगीरकर,महेश औरादे, अमोल तांदळे, सौरभ ताथोडे यांनी केले आहे.




