25.2 C
Pune
Friday, February 13, 2026
Homeसांस्कृतिकसिद्धेश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सव पूर्व तयारी आढावा बैठक

सिद्धेश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सव पूर्व तयारी आढावा बैठक

देवस्थान समिती व शासकीय यत्रंणांच्या समन्वयातून यात्रा महोत्सव यशस्वी करावा : अतिरिक्त जिल्हाधिकारी केशन नेटकेसिध्देश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सव पूर्व तयारी आढावा बैठक

लातूर/प्रतिनिधी : लातूरचे ग्रमदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने यावर्षी १५ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान महाशिवरात्री यात्रा महोत्सव पार पडत आहे. या यात्रा महोत्सवाच्या माध्यमातून लातूरची गौरवशाली परंपरा अधिकाधिक उज्ज्वल करत यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान समितीच्या सहकार्यातून सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, अशी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिली .

लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची पूर्व तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर, ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, नरेश पंड्या, रमेशसिंह बिसेन, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित होत असलेली महाशिवरात्री यात्रा महोत्सव हे लातूरचे वैभव आहे. या यात्रेची महती लातूर जिल्ह्यासह परजिल्ह्यात व इतर राज्यातही पोहोचली आहे. यामुळे या यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे, असे सांगून अतिरिक्त जिल्हाधिकारी केशव नेटके म्हणाले की, वाहतूक, पार्कींग व सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून शहर महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने तात्काळ आवश्यक त्या उपाय योजना सुरु कराव्यात असे सांगितले.

मंदीर परिसरात स्वतंत्र पोलिस कक्ष स्थापन करून त्या ठिकाणी ध्वनीनिक्षेपक व धोक्याची सूचना देणारी यंत्रणा सज्ज करावी. गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी रांग व्यवस्था योग्य प्रकारे करून या ठिकाणी देवस्थानच्या वतीने स्वयंसेवक नेमावे अशी सूचना करण्यात आली.महापालिका प्रशासनाने मंदीराकडे जाणाºया सर्व प्रमुख मार्गाची तत्काळ दुरुस्ती करून सुरक्षेच्या दृष्टीने पथदिवे तातडीने सुरु करावेत, अशी सूचना करून यात्रा महोत्सव परिसरात आरोग्य यंत्रणा व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी, असे केशव नेटके यांनी सांगितले. यात्रा महोत्सवादरम्यान परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने विशेष लक्ष देवून याठिकाणी स्वच्छता पथक तॅैनात करण्याची सूचनाही देण्यात आली. यात्रा महोत्सवात जे खाद्य पदार्थाचे स्टॉल उभारले जातात त्या ठिकाणी कोणतीही भेसळ होणार नाही याची दक्षता घेवून तेथील खाद्य पदार्थाचे नमुने वेळोवेळी घेवून अन्न औषध प्रशासनाने त्याची तपासणी करावे, असेही सूचित करण्यात आले. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येणाºया प्रदर्शाची अधिकाधिक प्रसिध्दी करून या माध्यमातून शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.देवस्थानच्या वतीने ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे यांनी काही अडचणी मांडल्या. त्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी नेटके यानी दिले.

यावेळी देवस्थानच्या वतीने यात्रेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणारे ध्वजारोहन व महाभिषेक यासाठी निमंत्रित करण्यातआले आहे. यावेळी पोलिस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परीषद, बांधकाम विभाग, महावितरण, अन्न व औषध प्रशासन आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]