19.7 C
Pune
Saturday, February 7, 2026
Homeउद्योगसिने अभिनेत्री जेनिलिया डिसुझा -देशमुख यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सचे उद्घाटन

सिने अभिनेत्री जेनिलिया डिसुझा -देशमुख यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सचे उद्घाटन

लातूरमध्ये सुवर्णयोग! सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांच्या हस्ते ‘कल्याण ज्वेलर्स’च्या नवीन दालनाचे दिमाखदार उद्घाटन!

*लातूरमध्ये सुवर्ण उद्योगात भरारी;

सिने अभिनेती जेनिलिया देशमुख यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सचे उद्घाटन*

लातूर : ( माध्यम वृत्तसेवा ):–शहराच्या व्यापारी क्षेत्रात आणखी एका नामांकित ब्रँडची भर पडली असून सुवर्ण उद्योगाला नवी ऊर्जा मिळाली आहे. देशभरात विश्वासार्हतेचे प्रतीक असलेल्या कल्याण ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे उद्घाटन आज सिने अभिनेत्री जेनिलिया डिसुझा – देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.उद्घाटन कार्यक्रमाला नागरिक, ग्राहक, व्यापारी वर्ग तसेच मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी जेनिलिया देशमुख यांनी कल्याण ज्वेलर्सच्या दर्जेदार दागिन्यांचे आणि पारदर्शक व्यवहार पद्धतीचे कौतुक केले. “ग्राहकांचा विश्वास जपणारा ब्रँड म्हणून कल्याण ज्वेलर्सची ओळख आहे. लातूरमध्ये हे दालन सुरू होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्या म्हणाल्या.नव्या दालनात सोनं, हिरे, चांदी तसेच पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचे आकर्षक दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहकांसाठी उद्घाटनानिमित्त विशेष सवलती व ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि दर्जेदार सेवा यामुळे ग्राहकांना वेगळा खरेदी अनुभव मिळणार आहे.कल्याण ज्वेलर्सच्या आगमनामुळे लातूरमधील सुवर्ण उद्योगाला चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. एकूणच, या उद्घाटनामुळे लातूरच्या व्यापारी व औद्योगिक क्षेत्रात नवचैतन्य आले आहे.

भारतातील सर्वात विश्वसनीय आणि अग्रगण्य ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज महाराष्ट्रातील लातूर येथील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मेन रोड येथे आपल्या नवीन शोरूमचा शुभारंभ केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या भागातील ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करणे हे या शोरूमचे उद्दिष्ट आहे. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सची एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट डिझाइन्स उपलब्ध आहेत, जसे की, मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने) इत्यादी अनेक लोकप्रिय इन-हाऊस ब्रँड्स याठिकाणी उपलब्ध आहेत.शाही थाट आणि डिझाइन्सचा खजिना असलेले हे लातूरमधील नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करेल.यावेळी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा म्हणाल्या, “कल्याण ज्वेलर्सच्या या नवीन दालनाचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-निष्ठेला महत्त्व देणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. मला खात्री आहे की, इथले वैविध्यपूर्ण, दर्जेदार दागिने आणि उत्कृष्ट सेवा ग्राहकांच्या मनाला नक्कीच भुरळ घालतील!

“नवीन शोरूमच्या उदघाटनाबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, “लातूरमध्ये हे नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे, दागिन्यांच्या खरेदीचे एक परिपूर्ण केंद्र ठरावे अशी आमची इच्छा आहे. जागतिक दर्जाच्या वातावरणात आणि सेवेतून एक उन्नत अनुभव देण्याची आमची वचनबद्धता कायम आहे, आणि तरीही आम्ही कल्याण ज्वेलर्सच्या विश्वास व पारदर्शकतेच्या चिरंतन मूल्यांशी घट्ट जोडलेले आहोत.”

या नवीन शुभारंभाच्या निमित्ताने, कल्याण ज्वेलर्सने स्टोअरमध्ये अनेक खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. साध्या सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर (Value Addition) प्रति ग्रॅम ७५० रुपये फ्लॅट सवलत, प्रीमियम आणि जडाव (Studded) दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १५०० रुपये फ्लॅट सवलत, तर टेम्पल आणि अँटिक दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १००० रुपये फ्लॅट सवलत देण्यात येत आहे. याशिवाय, ‘कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट’ देखील लागू असेल, जो बाजारपेठेतील सर्वात कमी दर असून सर्व शोरूम्समध्ये एकसमान आहे. हे सर्व फायदे केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहेत.कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा ‘बीआयएस’ (BIS) हॉलमार्क असलेला असून त्यावर शुद्धतेच्या विविध चाचण्या केल्या जातात. याव्यतिरिक्त, ग्राहकांना ब्रँडचे सिग्नेचर ‘४-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र’ (4-Level Assurance Certificate) मिळते, जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल (Free lifetime maintenance), उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांची हमी देते.या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय ‘हाऊस ब्रँड्स’ देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.

ब्रँड, त्यांची कलेक्शन्स आणि ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा – https://www.kalyanjewellers.net/ अटी व शर्ती लागू आहेत.*About Kalyan JewellersHeadquartered in Thrissur in the state of Kerala, Kalyan Jewellers is one the largest jewellery retailers in India with a presence in the Middle East and the USA. The company has enjoyed a longstanding presence in the Indian market for over three decades and has set industry benchmarks in quality, transparency, pricing and innovation. Kalyan offers an array of traditional and contemporary jewellery designs in gold, diamonds and precious stones catering to the distinct needs of customers. Kalyan Jewellers has over 400 showrooms across India, UAE, Kuwait, Qatar, Oman, USA and UK, with a retail area exceeding 9,08,000 sq. ft.—–END—–For additional information, please contact:Sahil Dani:+91- 9987755009- sahil.dani@adfactorspr.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]