भारतीय सैन्य दलातून बालाजी सूर्यवंशी सेवानिवृत्त
अंबुलगा(बु) ग्रामस्थांकडून जंगी स्वागत सत्कार..
निलंगा,(प्रशांत साळुंके)— लष्करातून सेवा करून परतलेल्या सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण भारतीय सैन्य दलात 24 वर्षे सेवा करून सेवानिवृत्ती घेऊन घरी परतलेले सैनिक बालाजी मधुकर सूर्यवंशी यांचे शुक्रवारी दि 3 डिसेंबर रोजी निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु ) ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. अंबुलगा बु जन्मभूमीत गावकऱ्यांनी अनपेक्षित केलेल्या स्वागताने जवान बालाजी मधुकर सूर्यवंशी भारावून गेले.
बालाजी मधुकर सूर्यवंशी 24 वर्ष लष्करात सेवा करून देशाच्या सैन्यदलातून नुकतेच हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाले.
सैन्यदलात जाण्याचे स्वप्न पाहणारे बालाजी सूर्यवंशी हे वयाच्या 20 व्या वर्षी सन 1999 मध्ये सैन्य दलात भरती झाले.तब्बल 24 वर्षांच्या सेवेत जम्मू काश्मीर आणि सियाचिन या भागात त्यांनी सर्वाधिक काळ सेवा केली. 1999 मध्ये पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे कारगिल युद्धात देश रक्षणासाठी सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.श्रीनगर,लेह,राजस्थान,हरियाणा, उत्तराखंड महाराष्ट्रात नागपूर ,अहमदनगर व लातूर येथे 53 महाराष्ट्र बटालियन मध्ये शिक्षक म्हणून सेवा केली आहे.2006 मध्ये त्यांच्या भारतीय सैन्य दलाच्या शांतीसेनेत निवड झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेलादेखील पाठविण्यात आले होते. घरी परतल्यानंतर असे स्वागत होईल, अशी किंचितही कल्पना नसलेले..सूर्यवंशी शुक्रवारी या जंगी स्वागताने व सत्काराने भारावून गेले. देशसेवा करून घरी परतलेल्या सैनिकाचे गावचे सुपुत्र म्हणून स्वागत करायला मिळणे, ही आम्हाला अभिमानाची बाब असल्याच्या प्रातिनिधिक भावना अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी बोलताना सेवानिवृत्त सैनिक बालाजी सूर्यवंशी म्हणाले, नोकरीची सेवा पुर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्वासापर्यंत सुरूच राहील .गावात युवकात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे.त्यांना त्यापासून परावृत्त करणे चांगल्या मार्गाला लावणे .व गरीब होतकरू तरुणां साठी एक अत्याधुनिक सेवा सुविधा सह सैनिक भरती प्रशिक्षण अकॅडमी काढून या ग्रामीण भागातील यवकाना सैन्यात भरती करणार आहे. आशा विविध माध्यमांतून लोकांना मदत करून देशसेवा सुरूच ठेवणार आहे.अशी प्रतिक्रिया बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.
यावेळी सूभाष म्हैञे, विलास पाटील,वामन भालके,अरविंद चव्हाण,शिवशंकर मिरगाळे, लालू शेख,भास्कर खडकउमरगे,संजय लोहार,नामदेव हाल्लाळे ,आशिष पाटील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.











