36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeजनसंपर्कसोलापूर तरुण भारतच्या समूह संपादकपदी राजा माने

सोलापूर तरुण भारतच्या समूह संपादकपदी राजा माने


मुंबई,दि-

सोलापूर तरुण भारतच्या मुंबई विभाग, मंत्रालय, कोकण विभाग,प.महाराष्ट्र आणि मराठवाडा आवृत्तीच्या मुख्य समूह संपादकपदी राजा माने यांची निवड झाली आहे.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष असलेल्या माने यांच्या कडे डिजिटल आवृत्त्या तसेच सोलापूर तरुण भारत मिडिया लि.च्या वृत्तवेध या चॅनलच्या मुख्य समूह संपादक पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.ते ही जबाबदारी मुंबईतून पार पाडणार आहेत.
गेली ३७ वर्षे राजा माने हे मराठी वृत्तपत्रसृष्टीत श्रमिक पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.लोकमत, पुढारी, पुण्यनगरी, सुराज्य या दैनिकांमध्ये संपादक, कार्यकारी संपादक, राजकीय संपादक आदी पदांवर त्यांनी आजवर काम केले आहे.ते महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या पुणे व कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राहिले आहेत.राज्य मराठी पत्रकार संघाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.तत्कालिन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यासमवेत त्यांनी ब्रिटन व सायप्रस या देशांचा दौरा केला आहे.तसेच युरोप, अमेरिका, तुर्कस्तान, इंडोनेशिया, दुबई आदी देशांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी सात पुस्तकांचे लेखन केले आहे.महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील आणि लेक माझी लाडकी ही पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. तर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

संक्षिप्त परिचय
नाव: राजेंद्र ज्ञानदेव माने ऊर्फ राजा माने
शिक्षण:बी.ए.(तत्त्वज्ञान),एम.बी.ए.
पत्रकारिता कारकीर्द: दैनिक लोकमत समूह-राजकीय संपादक (महाराष्ट्र)
संपादक (कोल्हापूर, कोकण,सोलापूर),
प्रशिक्षणार्थी उपसंपादक (औरंगाबाद)
उपसंपादक/जिल्हा प्रतिनिधी (परभणी),आवृत्ती प्रमुख व शाखा व्यवस्थापक,मुख्य उपसंपादक (अहमदनगर),वृत्तसंपादक (सांगली),
दैनिक एकमत: संपादक (लातूर)
दैनिक पुढारी : कार्यकारी संपादक (पुणे व अहमदनगर आवृत्ती)
दैनिक पुण्यनगरी : कार्यकारी संपादक (द.महाराष्ट्र, कोकण, बेळगाव व सोलापूर)
दैनिक सुराज्य : संपादक, अध्यक्ष व कार्यकारी संचालक (सोलापूर)

पुरस्कार:


महाराष्ट्र शासनाचा विकास वार्ता पुरस्कार (दोन वेळा),मुंबई मराठी पत्रकार संघाचा कै.काकासाहेब खाडिलकर पुरस्कार,पत्रमहर्षी कै.पां.वा.गाडगीळ उत्कृष्ट बार्ता पुरस्कार (दोन वेळा),कै.वाबा दळवी शोधपत्रकारिता पुरस्कार,पत्रमहर्षी दा.प. आपटे पुरस्कार, पद्मश्री मणिभाई देसाई पुरस्कार
पद्मश्री विठ्ठलराब विखे-पाटील पुरस्कार,सोलापूर महापालिकेच्यावतीने सोलापूर भूषण पुरस्कार,बार्शी नगरपालिकेच्यावतीने बार्शी भूषण’ पुरस्कार,बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार,प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार,महाराष्ट्र शासनाचा नानासाहेब परुळेकर पुरस्कार,कविवर्य रा.ना.पबार साहित्य पुरस्कार,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार,
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार,शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार,डॉ.चंद्रकुमार नलगे साहित्य पुरस्कार,माढेश्वरी साहित्य पुरस्कार,राज्य ग्रामीण पत्रकार संघाचा पत्रकार भूषण पुरस्कार,कोल्हापूरच्या नाना प्रेमी मंडळाचा यशवंत पुरस्कार,मराठा महासंघाचा मराठा दरबार पुरस्कार,विजयसिंह मोहिते-पाटील ग्रंथमित्र पुरस्कार,
संपादक परिषदेचा म.शि.परांजपे पुरस्कार,सोलापूर येथील मनोरमा साहित्य पुरस्कार,देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचा ल.गो.काकडे पुरस्कार,कृ.भि.अंत्रोळीकर प्रतिष्ठानचा हुतात्मा कुर्बान हुसेन पुरस्कार.
विशेष उल्लेखनीय:
विदेश दौरे-तत्कालिन मा.राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या समवेत युनायटेड किंगडम व सायप्रस देशांचा दौरा. युरोप,अमेरिका, दुबई, तुर्कस्तान, इंडोनेशिया.
संस्थात्मक कार्य: संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, विश्वस्त संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी,माजी अध्यक्ष, महाराष्ट्र शासन पुणे व कोल्हापूर विभागीय माध्यम अधिस्वीकृती समिती,माजी प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
प्रकाशित पुस्तके :महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा,अग्निपंख(अग्रलेख संग्रह)लेक माझी लाडकी, गुरुजन,उगवतीचे रंग, चारुकीर्तीवाणी

मोबाईल क्.-९९२२९२८१५२
rajamane61@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]