25.6 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeमहाराष्ट्रसोसायटी निवडणूकीत काँग्रेस पराभूत

सोसायटी निवडणूकीत काँग्रेस पराभूत

चिकलठाणा सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलचा धुवा,

आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात भाजपाचा दणदणीत विजय

            लातूर दि.०६- लातूर तालुक्यातील मौजे चिकलठाणा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकरी विकास पॅनलने घवघवीत विजय संपादन केला असून या निवडणूकीत काँग्रेसच्या मातब्बर पुढाऱ्यांना पराभव पत्करावा लागला. पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही सोसायटी आता भाजपच्या ताब्यात आली आहे.

                चिखलठाणा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक तिरंगी लढत झाली. काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांच्या पदरी निराशाच आली. या निवडणुकीत विकास कारखान्याच्या संचालकासह तब्बल चौदा वर्षे चेअरमन असलेल्या काँग्रेस पुढाऱ्याचा पराभव झाला आणि भाजपाचे नेते आमदार रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वाखालील युवा शेतकरी विकास पॅनलने प्रचंड घवघवीत यश संपादन केले. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला     

         चिकलठाणा येथील सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक प्रताप पाटील, व्यंकोबा इंगळे, शाहूराज भरबडे, शिवाजी भरबडे, नितीन जाधव, लक्ष्मीबाई इंगळे, सरस्वती जाधव, मोतीराम पांचाळ, शिवदत्त भारती, तुळशिराम कांबळे, विकास इंगळे यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी गुरुवारी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उमेश इंगळे, प्रवीण पाटील, बाळासाहेब इंगळे, विशाल जाधव, प्रशांत पाटील, राजाभाऊ जाधव, चेतन भरबडे, बालाजी भरबडे यांच्यासह अनेक जण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]