इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील संजीवनी पब्लिकेशनच्या संस्थापिका सौ.निता किरण बन्ने यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आनंदगंगा फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल सौ.निता बन्ने यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
कोल्हापूर येथील आनंदगंगा फौंडेशनच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक ,कला – सांस्कृतिक ,उद्योग – व्यवसाय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.
इचलकरंजी येथील संजीवनी पब्लिकेशनच्या संस्थापिका सौ.निता किरण बन्ने यांनी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या भाषेत गृहपाठ पुस्तकांची निर्मिती केली आहे.त्यामुळे मुलांसोबत पालकांचा देखील ञास कमी होवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ झाली आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच आनंदगंगा फौंडेशनने यंदाच्या वर्षी त्यांची राज्यस्तरीय
नारीशक्ती पुरस्कारासाठी निवड केली आहे.या पुरस्काराचे वितरण घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात शिवसेना महिला आघाडी सांगली जिल्हाध्यक्षा योजना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी ऋता कळमणकर तर व्यासपीठावर सोलापूर जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे,संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले ,पेठ वडगांवचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी , फौंडेशनचे संस्थापक तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास राजकीय , सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल सौ.निता बन्ने यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.