अक्का फाऊंडेशन व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने दिले ३५ ऑक्सिजन काँसंट्रेटर…
माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते दोन रूग्णालयांना केले सुपुर्द…
निलंगा,-( प्रतिनिधी)-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रूग्णांना अडचण येऊ नये म्हणून अक्का फाँडेशन व मराठा चेंबर आॕफ काॕमर्सच्या वतीने ३५ आॕक्सिजन काँसंट्रेटर देण्यात आले आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी येथील रुग्णालयास १५ तर शहरातील उपजिल्हा रुग्णालयास २० असे एकून काँसंट्रेटर देण्यात आले असून कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हा सामाज हिताचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अक्का फाँडेशनने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत रूग्णतिथे आॕक्सिजन घरपोच उपलब्ध दिले होते.या काँसंट्रेटरमुळे अनेकांचा जीव वाचला होता तसेच याचे मोठे सहकार्य झाले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन दिलेली ही मदत नक्कीच लाभदायक ठरणार आहे.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय अक्का फाँडेशन व मराठा चेंबर्स आॕफ काॕमर्सने हेतला असून तो माणव हिताचा ठरणार आहे.अक्का फाँडेशने आतापर्यंत राज्यात मराठा चेंबर्स आॕफ काॕमर्सला सर्वात जास्त निधी दिला असून याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला आहे.तसेच पाडव्याच्या शुभ मोहर्तावर ३५ आॕक्सिजन काँसंट्रेटर तालुक्यातील औराद शा.येथे १५ व शहरातील उपजिल्हा रूग्णालयात २० देण्यात आले आहेत अशी माहिती माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी दिली.

यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर,डॉ पी.टी.साळुंके,डॉ ज्ञानेश्वर कदम,शेषराव ममाळे,विरभद्र स्वामी,रजाक रकसाळे,पाशामिया अत्तार,किशोर लंगोटे,प्रकाश नाटकर तानाजी बिरादार,सुमित इनानी,प्रदीप पाटील अदी उपस्थित होते.











