नेहरू युवा केंद्राच्या वतीने हाळी खुर्द येथे स्वच्छता जनजागरण व श्रमदान कार्यक्रम संपन्न
————————————————-
चाकूर – भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र लातुर च्या वतीने हाळी खुर्द (ता.चाकूर) येथे शनिवार (दि.२५) रोजी स्वच्छता जनजागरण व श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जल पुनर्भरण पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मुनिरपाशा पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकूर तालुका समन्वयक प्रा.प्रशांत साबणे, नेहरू युवा मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया जनगावे, एकल महिला संघटनेच्या अध्यक्ष अफसना शेख, बचत गटाच्या अध्यक्षा मेहरूनबी शेख, आशा स्वामी उपस्थित होत्या.
आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने देशभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा समन्वयक साक्षी समैया, लेखाधिकारी संजय ममदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हाळी खुर्द येथे नेहरू युवा मंडळ, एकल महिला संघटन, बचत गट व ग्रामपंचायत यांच्या वतीने ग्रामस्वच्छता करण्यात येऊन श्रमदान करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस संगमेश्वर जनगावे, हाकानी सय्यद, बालाजी शिंदे, कौस्तुभ राठी, आकाश सरवदे, कृष्णा जाधव, लक्ष्मण जाधव, सूरज पिसे, ओम चामले, सुमित शिंदे, लक्ष्मण भालेराव यांच्यासह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











