सिनेमा.. सिनेमा
भारताला 1947 झाली स्वातंत्र्य मिळाले पण महिलांसाठी अजूनही ते स्वप्नवत आहे. लहान वयात लग्न झालेल्या मुलीचा नवरा वारल्यानंतर तिच्या पुनर्विवाहासाठी समाजाची मान्यता मिळावी म्हणून खूप काळ संघर्ष करावा लागला. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना सर्वसाधारण जीवनही नीटपणे जगता येत नाही. ही वस्तुस्थिती वस्तुस्थिती आजही कायम आहे. मुलींना बहुतांश कुटुंबात अजूनही परंपरागत भूमिकाच निभवावी लागते. तिच्या भाव-भावना, तिची मते, प्रेम आदींना फार किंमत दिली जात नाही.
पांघरूण ही अशाच एका मुलीची कहाणी आहे, जिचे निर्णय दुसऱ्याच कोणीतरी तिच्यावर लादलेले आहेत. वडीलधाऱ्यांनी सांगितले त्याच्याशी तिने लग्न करायचे, प्रेम करायचे, त्याचा संसार करायचा! आणि हे एकवेळ नाही तर विधवा झाल्यानंतरही तिने हेच पुन्हा सहन करायचे!
ख्यातनाम कवी बा. भ. बोरकर यांच्या लघुकथेवर आधारित हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
पांघरूण ही प्रेम, करुणा व अंतिम बलिदानाची दुख:द कहाणी आहे. कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली, ही एका विशिष्ट काळातील कथा पाहण्यासाठी अवश्य या. चित्रपटातील गाणी अप्रतिम आहेत. चित्रपट चुकवू नका.

श्याम जैन




