*आझादी का अमृतमहोत्सव अभियानात लोकांचा सहभाग महत्त्वाचा-जिल्हा परीषद अध्यक्ष राहुल केंद्रे*
🪴💧स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 चा राहुल केंद्रे यांच्या हस्ते शुभारंभ…
👉🏻 उपस्थितांना दिली स्वच्छतेची शपथ
लातूर दि 22
स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यासाठी घोषणा करण्यात आली असून या सर्व उपक्रमात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले गाव शाश्वत स्वच्छतेकडे घेऊन जाण्यासाठी या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले आहे.
डि पी डिसी सभागृह लातूर येथील आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, कृषी सभापती गोविंद चिलगुरगे,समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे,महिला बालकल्याण सभापती ज्योती ताई राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना म्हणाले की अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की
गाव सर्वांगिण विकसीत करण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.आज पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही तितकेच महत्त्वाचे तसेच गावे शाश्वत करण्यासाठी सर्वांनी स्वच्छता सर्वैक्षण मध्ये सहभागी व्हावे हे अभियान
सर्वेक्षण १ ते ३१ आक्टोबर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणदरम्यान होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात उत्कृष्ठ ठरणारे जिल्हे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.उत्कृष्ट काम करणाºया जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाºया सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. यामध्ये हागणदारीमुक्त गावाची पडताळणी, शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे.
प्रत्यक्ष पाहणीअंतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडा बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीणभागातील नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच आॅनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे.देशभरातील गावांचा समावेशस्वच्छाग्रही खुली बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत.प्रत्येक तीन ते चार गावांचे सरपंच, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे.गावाच्या पाहणीदरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली जाईल.‘ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल मार्गदर्शन करताना म्हणाले कीआझादी का अमृतमहोत्सव निमित्ताने जिल्ह्यातील गावागावात हागणदारीमुक्त शाश्वतता टिकविणे यासाठी 1 सप्टेंबर 2021 पासुन वेगवेगळे * चार अभियान चालु आहेत.तरी याबाबत अंमलबजावणी करण्यात येत आहे
*1)1 सप्टेंबर 2021 ते 15 आगस्ट 2022या कालावधीत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपक्रम*२)*घोष वाक्य लेखन स्पर्धा
*3) सार्वजनिक ठिकाण भिंती रंगविणे
*4) 100 दिवसांचे शौषखड्डे स्थायित्व व सुजलाम अभियान
असे चार अभियान चालु आहेत.यात जिल्ह्यात 75 हजार शोषखड्डे करणार असल्याचे सांगितले.त्यासाठी सर्व सरपंचांनी व ग्रामसेवक यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले .
याप्रसंगी ग्रामसमृध्दीतुन राष्ट्रभक्ती या विषयावर संवाद तज्ञ उध्दव फड यांनी मार्गदर्शन केले तर जल जीवन मिशन विषय सविस्तर मार्गदर्शन कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांनी केले.तर कार्यशाळेचे प्रस्ताविक व आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी केले यावेळी बोलताना म्हणाले की गावे अधिक शाश्वत स्वच्छता करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे या गावातील महिला बचत गट, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असणारे युवा कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन चळवळ उभी करावी असे ते म्हणाले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संवाद तज्ञ उध्दव फड यांनी केले यावेळी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.