29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeलेख*स्वातंत्र्य सेनानी कमलाबाई उर्फ शकुंतला नारायणराव चाकूरकर*

*स्वातंत्र्य सेनानी कमलाबाई उर्फ शकुंतला नारायणराव चाकूरकर*

स्वातंत्र्य सेनानी कमलाबाई उर्फ शकुंतला नारायणराव चाकूरकर 

(जन्म- ८ जानेवारी १९२९- मृत्यु १३ जुलै २०२३)

कमलाबाई यांचा जन्म- ८ जानेवारी १९२९ ला बेंगलोर (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे घर बंगलोरच्या संपगी रोडवर होते. त्यांच्या आईना लहान वयातच मुले झाली. कमला व चंपा या दोन मुली व एक मुलगा. 

 त्यांचे आई, बाबा व भाऊ लवकरच वारले. त्यामुळे त्यांची आजी व मामा(श्रीपादराज)यानाच या दोन्ही मुलींना सांभाळावे लागले. त्या काळात लग्न लहानपणी करण्याची प्रथा असल्याने, अवघ्या सहाव्या वर्षीच कमलाचे लग्न झाले. सासरची मंडळी स्वयंपाक येत नाही म्हणून बेदम मारहाण करीत असत. 

एकदा बेशुद्ध पडे पर्यंत मारून रस्तावर फेकून दिले. कुणीतरी त्यांना ओळखले व मामाना निरोप दिला. त्यानंतर पुढील सांभाळ मामांनी केला.

हैद्राबादला काही काळ कमलाला ‘ गुरुकुल’ मध्ये ठेवण्यात आले होते . तेथे असतांना पोहणे, लाठी चालवणे, ज‌ंबीया याचे शिक्षण मिळाले .

बिदरला मामाच राष्ट्रीय कार्य चालू असल्यामुळे आपसुकच राष्ट्रीय कार्याची भावना कमलात रुजत गेली. परकराच्या ओच्यातून मजकुरांचे पत्र इकडून तिकडे पोहचवण्यांचे काम सुरू केले.

 एकदा बिदरच्या चौबारयावर तिरंगा झेंडा फडकावयाचा होता, पण झेंडा वर न्यायचा कसा असा प्रश्न पडला. त्यावेळेस कमलाने मोठ्या शिताफिने झे‌ंडा वर पोहचवला.

बिदरला राहत असताना सर्वधर्मिय लोकांशी कमलाचा संपर्क आला. बिदरला इटकेपल्ली देशपांडे यांनी चर्म कार्यालय‌ काढले. ते कार्यालय गावाबाहेर ओस पडलेल्या भूताच्या वाड्यात होते. याच कार्यालयात नारायणराव चाकूरकर कार्यरत होते. त्यांची व मामाची भेट झाली. ते अधून मधून मामाकडे जेवायला यायचे.

तोपर्यंत कमला हि १६ ते १७ वर्षाची देखणी मुलगी झाली होती. नारायणरावानी तेथेच कमलाला पाहिले. ‘नारायणराव स्वतः पुरोगामी विचाराचे असल्याने कमलाचा

पूर्व इतिहास माहित असूनही, त्यांनी मामाकडे लग्नांची मागणी घातली.

या लग्नासाठी नारायणरावाना घरच्या कडून विरोध होता. कन्यादान मामानीच कासोटीला सुपारी खोचून करायचे ठरले तेव्हा उस्मानाबादचे डॉ. श्री. शामराव गजेंद्रगडकर व सौ. कमल गजेंद्र गडकर यांनी कमलाला मानस कन्या मानले. त्यांनी उस्मानाबाद येथेच साध्या पद्धतीने कन्यादान केले.

या लग्नाला श्री स्वामी रामानंदतिर्थ, श्री. बाबासाहेब परांजपे, श्री फुलचंद गांधी व इतर कार्यकर्ते हजर होते हे लग्न इ.सन १९४६ ला झाले.

लग्नानंतर स्वातंत्र्य-चळवळीतला संसार सुरू 

झाला. त्याच वर्षी (१९४६ )ला नारायण रावावर पकडवारंट निघाले. त्यानंतर कमलाबाई एकट्याच वर्ध्याला गांधीजीच्या आश्रमात गेल्या, तिथे गांधीजीच्या विचारांचा कमलावर फार मोठा प्रभाव पडला. ग्राम सफाईसाठी गांधीजी बरोबर खेडोपाडी जाव लागत असे. त्यांचा आवाज गोड व चढ़ा असल्याने गाण्यातून जनजागृती साठी गाण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.

एकदा गांधीजीने विचारले “बेटी आगे क्या करने का इरादा है ?” आपकी उमर तो कम है। ह्या वर कमला गप्पच होती. मग पुढे गांधीजीच म्हणाले ” मिडवाईफ का कोर्स” करो और ग्रामीण महिलाओंकी सेवा का काम करो!

कमला पुढे नागपूरला गेल्या, तेथे कमलालाई हॉस्पेट ,सिताबर्डी येथे मिडवाईफच्या कोर्स साठी हजर झाल्या. कोर्स पूर्ण केला.

त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. उदा. कानडी, तेलगू तमिळ, उर्दू, हिन्दी, त्यामुळे इतराशी बोलताना सोपे जाई. नागपुर हुनच चळवळीतील लोकांना शस्त्रास्त्रे पुरवणे,हे काम चालू झाले. कपाळावर गोंदण नव्हेत म्हणून. ‘ करीमबी’ हे नाव सांगून बुरख्या आडून शस्त्रास्त्रे पुरवत असत.

शस्त्र पुरवठा करतांना ‘जबलपुर, सोलापुर, मनमाड, बार्शी, हैद्राबाद ,मुंबई अशी भ्रमंती चालू होती. शस्त्रात- काडतूसे, हात बॉंब, स्टेनगण, रिव्हाल्वर इत्यादी हत्यारे भूमिगत कार्यकर्त्याना पोहचवत असत, ह्या भ्रमंती दरम्यान अनेक धोकादायक प्रसंगाना सामोरे जावे लागले.

एकदा शस्त्राच्या पेट्या हैद्राबादच्या कांग्रेस- कार्यालयात पोहचवायच्या होत्या, हैद्राबादच्या रेल्वेस्टेशनवर उत्तरल्यावर टॅक्सी केली, टॅक्सीवाल्याला कॉंग्रेसच्या कार्यालयाचा पत्ता सांगितला. तो टॅक्सीवाला बराच वेळ टॅक्सी इकडे तिकडे फिरवू लागला. कमलाला रेल्वे स्टेशनच्या जवळच कार्यालय असल्याचे सांगितले होते. त्यांनी साधारण- अंदाज़ा घेतला की टॅक्सीचे मागचे दार उघडता येते का . मग त्यांनी टक्सी वाल्याला सांगितले, ‘मुझे यही उत्तरना है। आगे नही जाना है” दरवाजा उघडून उडी मारण्याच्या तयारीत बसल्या. टॅक्सी थांबताच पेट्यांसहित पटकन खाली उतरल्या. लोक जमा झाले. त्या लोकांनी त्यांना- कांग्रेस कार्यालयात पोहचवले.

दुसरा प्रसंग असा होता की, शस्त्रांची पेटी घेऊन ‘करिमबी’च्या वेश्यात रेल्वेस्टेशनवर आल्या. गाडी सुटली होती. त्यामुळे घाई घाईत समोरच्याच एका डब्यात चढल्या खऱ्या, गाडीने वेग घेतला त्या डब्यात “शिख रेजिमेंटचे भारतीय सैनिक होते. रजाकारच्या अती अन्यायी कारवायाची माहिती त्यांना (सैनिकांना) होती. कमलाला बुरख्यात पाहून त्याच्यांत नेत्र-पल्लवी सुरू झाली. हे चतुर कमलाबाईन ओळखले. मी तुमच्या सारखीच देशकार्याला मदत करणारी आहे. असे त्यांना सांगितले तेव्हा त्या जवानानी त्यांना पुढच्या स्टेशनला सुरक्षितपणे महिलांच्या डब्यात बसवून दिले. भूमिगत राहून कार्य करतांना नारायणराव व कमला यांच्या नावात बदल केला गेला. दुष्यंत व शकुंतला या टोपण नावाने सर्व कार्यकर्ते त्यांना खोळखत असत.

देशकार्यासाठी ,आर्थिक बाजू सावरण्यासाठी “उमरी बैंक लुटणाचे ठरले. त्यांत नारायणराव ही सहभागी होते. बँक लुटुन झाल्यावर पोलीस पकडण्यासाठी आले. त्या पोलिसांची दिशाभूल करायासाठी नारायणराव विरुद्ध बाजूला पळाले.त्याच्या मागावर पोलीस असल्याने नजर चुकवून उंचटेकडीवर चढले. सर्वत्र पहारा, उतरण्यास मार्ग न सापडल्याने त्यांनी खाली उडी मारली ते खाली काट्यात पडले. तेथेच ते रात्रभर निपचित पडून होते सकाळी कन्हण्याच्या आवाजामुळे जवळून जाणाऱ्या भंग्याने पाहिले. आपल्या बरोबर उचलून घरी नेले व उपचार हि केले . तीन-चार दिवसात नारायणरावाचा‌ पत्ताच लागला नाही.त्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. 

स्वामीजीनी कमलाबाईनी सांत्वन पर पत्र पाठवले . ‌या पत्रात स्वामीजींनी असे सांगितले की, नारायणरावाचे राहिलेले अर्धे कार्य तुलाच पुर्ण करायचे आहे.

कमलाने दुःखाने आपल्या गळातले, काळे मणी तोडून टाकले .

या घटने नंतर काही दिवसांनी अचानक नारायणराव घरी आले. त्यांचे रूप पूर्ण बदलेले होते. हा कोण परका माणूस म्हणून कमलाने त्यांच्या गालावर जोरात चपराक मारली. तेव्हा मीच नारायण (दुष्यंत) आहे . ओळख पटल्यावर त्याच रात्री दोघांनी पुन्हा मंगळसूत्र ओवून , नारायणरावाने कमलाच्या गळ्यात बांधले.

अश्या प्रकारे अनेक संकटावर मात करत दोघांचा जीवन प्रवास चालू असताना दोन मुलीच्या जन्म झाला. दुसऱ्या मुलीच्या वेळेस अतिशय रक्तस्त्राव झाल्याने कमलाच्या जीवावर बेतले होते. त्या वेळेस त्यांच्या मोठ्या नणंदेने (सत्यभामाबाईनी) खूप काळजी घेतली. त्यामुळे त्या सावरल्या.

भारताच्या पहिल्या निवडणूकीत नारायणरावाचे मित्र, श्री फुलचंद गांधी हे उमेदवार म्हणून उभे राहिले .त्यांच्या प्रचारासाठी नारायणराव फिरत असताना ताप अंगात मुरला . प्रकृतीकडे लक्ष न दिल्याने टि.बी थर्ड स्टेज ला गेला‌, त्याच निवडणुकीत श्री फुलचंद गांधी निवडून आले. त्यांना मंत्री मंडळात हेल्थ मिनिस्टर म्हणून नेमण्यात आले. त्यामुळे त्यांनी आपला मित्र नारायणरावाची पुरेपूर काळजी घेतली. या आजारात नारायणरावाच्या डाव्या बाजूच्या पाठी मागच्या फासळ्या काढाव्या लागल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूकच झाली . 

या कठिण काळात सर्व घरच्या लोकांनी कमलला‌ दूर केले.

कमलाला या प्रत्येक कठिण प्रसंगासाठी टक्कर देण्याच्या ताकदीचा उपयोग झाला .

पूर्वीच गांधीजीच्या सांगण्यावरून कमलाने मिडवाईफचा कोर्स पूर्ण केला असल्याने श्री फुलचंद गांधींनी त्यांना चिडगुप्पा (कर्नाटक) येथे आरोग्य खात्यात नोकरी‌ दिली. त्यांचा स्वतःचा स्वाभिमान‌ व कामात अगदी चोख असून हि वरिष्ठाचे अरे तूरे त्यांना खपत नसे. त्या स्पष्ट बोलणाऱ्या होत्या त्यामुळे त्यांचे “सिव्हिल सर्जन ” बरोबर वाद झाले.

डॉ. परोपकारी यांनी कमलाची परिस्थिती, व कष्ट करण्याची धडपड पाहूनच “शिक्षण खात्यात “बदली केली.

 भाषावार प्रांत रचना मुळे त्या महाराष्ट्रात आल्या .उदगीर येथे जि.प. प्राथमिक शाळेत रुजू झाल्या. त्यानंतर दोन मुलांचा जन्म झाला. त्यांचा संसार आता कुठे चालू झाला होता. तीन मुली व एक चार वर्षाचा मुलगा. नारायणरावाची नोकरी उस्मानाबाद येथे होती

त्यामुळे रविवारी तेथून लातूरला येत असताना दि. २ डिसेंबर १९६३ साली ढोकी जवळ रेल्वे बसचाअपघात झाला. बसमध्ये असलेल्या नारायणरावाना डोक्याला जब्बर दुखापत होऊन स्मृतिभ्रंश झाला.

 कमलाबाईच्या दुदैवी जीवनाची सुरुवात झाली.स्मृतिभ्रंश झाल्याने डॉक्टरानी कमलाबाई यांना आता तुम्हाला नारायणरावांना मुला प्रमाणेच सांभाळावे लागणार आहे. चार मुले, व पति अश्या पाच जणांना सांभाळण्यांची पूर्ण जबाबदारी कमलावर पडली.आशा पडत्या काळात बऱ्याच लोकांनी सहकार्य हि केले.

स्वतःवर आलेल्या अनेक अडचणीच्या अनुभवा मुळे त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा निश्चयच केला. त्यांनी शिक्षणाकडेच लक्ष देऊन चार हि मुलांना शिक्षण दिले. सर्वाना स्वावलंबी बनवले

हे सर्व करत असताना सामाजिक बांधीलकी जपली. गरीब व होतकरू मुलांना शिक्षणासाठी सर्वार्थानी मदत केली.

१९७२ च्या दुष्काळात कॉलेज सोडुन जाणाऱ्या चार-पाच मुलांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण चालू ठेवले.

इ सन् १९६३ च्या बस-रेल्वे अपघातात मिळालेल्या आर्थिक मदतीतून १९७० ला घर बांधले. इ सन २०१३ मध्ये पहिले घर-पाडुन बिल्डर करवी ” राघवेंद्र हाईटस” बारा सदनीकाची चार मजली इमारत उभी केली.

 त्यांनी आपल्या तिन्ही मुली व मुलगा यांना एक-एक सदनिका बक्षीस पत्रा द्वारे दिली.

घरी आलेला कोणताही व्यक्ती उपाशी जाणार नाही याची शेवट पर्यत कटाक्षाने काळजी घेतली.

सर्वावर ममतेची पांघरूण घालणारी, अनेक कठिण प्रसंगाला झुंझारपणे लढा देणाऱ्या व्यक्तिमत्वापुढे नत मस्तक होऊ या.

‘अल्पशा आजाराने १३ जुलै २०२३ या दिवशी हे अनमोल व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाले.

शत: वंदन

                    समस्त चाकूरकर परिवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]