18.6 C
Pune
Thursday, December 18, 2025
Homeसामाजिक*स्व. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर*

*स्व. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर*


दिलीप खिस्ती, कल्याण कुलकर्णी आणि मनीषाताई तोकले पुरस्काराचे मानकरी

देवडी, बीड : बीड येथील दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीपराव खिस्ती, बीड रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा शेतीनिष्ठ शेतकरी कल्याणराव कुलकर्णी, आणि सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले यांना यंदाचे स्व. माणिकराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत.. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने यावर्षी पासून हे पुरस्कार देण्यात
येत आहेत.. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम देशमुख आणि न्या. दिलीपराव देशमुख यांनी आज येथे पुरस्कारांची घोषणा केली..मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच देवडी येथे एका शानदार समारंभात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे..

माणिकराव देशमुख दोन वेळा देवडी गावचे सरपंच होते.. गावच्या सर्वांगिण विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते.. शेती आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने सामाजिक, कृषी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारया मान्यवरांना दरवर्षी गौरविण्याणयाचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे.. ..
लोकप्रश्न दैनिकाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे मोठं कार्य दिलीपराव खिस्ती यांनीए केलं आहे.. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “माणिकराव देशमुख पत्ररत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे..


जेथे कुसळ उगवत नव्हते अशा धुनकवडच्या माळरानावर स्वकष्ठाने नंदनवन फुलवून बीड जिल्ह्यातील शेतकरयांना आदर्श ठरलेले आदर्श शेतकरी कल्याणराव कुलकर्णी यांना कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे..
सर्वसामान्य जनतेचे आणि आणि विशेषत:महिलांचे प्रश्न वेशिवर टांगून त्यांना न्याय मिळवून देणारया मनीषाताई तोकले यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे..
यापुढे दरवर्षी हे पुरस्कार दिले जातील असेही एस.एम देशमुख आणि न्या. दिलीप देशमुख यांनी जाहीर केले आहे…पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असेही प्रतिष्ठानच्यवतीने जाहीर करण्यात आले आहे…उद्या गुरूवारी माणिकराव देशमुख यांचा पहिला स्मृतीदिन आहे.. त्यानिमित्त देवडी येथे ह. भ. प. श्री. भागवत महाराज नखाते यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]