कर्म ,क्रिया,वासना,आसक्तीतून मुक्त होण्याकरता नामस्मरण सेवा हाच राजमार्ग आहे ……ज्ञानराज महाराज
……………………………………
औसा दिनांक 16…( अँड.शामराव कुलकर्णी यांजकडून)
……………………………………
कर्म वासना क्रिया आसक्ती यातून मुक्त होण्यासाठी आणि प्रपंच चक्राचा फेरा चुकवण्यासाठी नामस्मरण सेवा हाच एक राजमार्ग आहे त्यासाठीच या गुरुपरंपरेने चक्रीभजनाची उपासना दिली आहे ,असे विचार ह भ प श्री ज्ञानराज महाराज यांनी व्यक्त केले.
औसा येथे ज्ञाथमंदिरात पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांची श्रावणमास अनुष्ठान सुरू आहे.यात नित्य चक्रीभजना नंतर ज्ञानेश्वरी प्रवचनात ज्ञानराजमहाराज बोलत होते.

सेवेकरीता १८ व्या अध्यायातील ९ व्या श्लोकातील ओवी क्रमांक ५/६ या ओवीवर सुंदर सहज सोपे निरूपण करताना श्री ज्ञानराज महाराज माऊली यांनी आपल्या अंतकरणात जो आत्मा आहे त्याला परमात्म्याची भेट होण्याकरता भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे जो सोपा वाटत असेल तरी व्यापक आणि कठीण आहे कारण नित्यनेम नित्य नामस्मरण आणि नित्यसेवा याला यात प्राधान्य आहे आचार विचार कर्म यावर त्याच्या फलश्रुती अवलंबून आहेत
वस्तू बाबत आपण विचार करताना ती स्वच्छ चकचकीत निर्मळ हवी असते वस्त्र देखील स्वच्छ निर्मळ आणि झगझगीत हवे असतात मग मन तसे स्वच्छ निर्मळ नको का , असा सवाल करीत महाराज म्हणाले घर अंगण गाव वस्ती प्रसाद मंदिर मठ आपला देश सारे स्वच्छ निर्मळ सुंदर आणि मंगलमय असावेत हे खरे व आवश्यक तसेच मनही स्वच्छ निर्मळ निर्विकार आणि सात्विक असणे जरुरीचे आहे तेव्हाच आपण साधनेत एकरूप होऊन गुरुचरणाशी आणि भगवंत परमात्म्याशी अनुसंधान बांधू शकू आणि ही प्रक्रिया घडली की आपोआपच आपण या मायाजाल अर्थात प्रपंच चक्रातून मुक्त होण्यास पात्र ठरतो असे श्री ज्ञानराज महाराज म्हणाले.

आज पुत्रदा एकादशी आहे याचे महत्त्व विशेष आहे तसे प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महात्म्या असल्याचे सांगून महीशमती राज्याच्या महिपती राजाची कथा त्यांनी अत्यंत समर्पकरीत्या सांगितली एकादशी दिवशी नियमाने उपवास करून देखील द्वादशीला तहानलेल्या एका गाईस हकल्याचा दोष त्या राजाला लागतो आणि तो पुत्रहीन राहतो जेव्हा त्या स या पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याची सूचना लोमेश ऋषी हे देतात तेव्हा त्याला गतजन्मीच्या या भोगापासून मुक्तता लागून पुत्रप्राप्ती होते हा दृष्टांत यथार्थपणे कथन केला.
सद्मगुरु नाथ महाराज संस्थान मधील आद्य पुरुष विरनाथ महाराजांच्या पत्नी आणि द्वितीय सत्पुरुष मल्लाप्पा महाराजांच्या आई साध्वी तपस्वी महादामाय यांचा जन्मदिन परवा संस्थानात संपन्न झाला .त्यांचे या परंपरेतील योगदान कार्य हे खूप महान आहे असे महाराजांनी सांगितले. त्यांना जी कामना कराल ती फलद्रूप होते हा शिष्य भक्तांचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
श्री धोंडीराम ढगे दत्तात्रय , काटे, आदींची शुक्रवारी माळसेवा झाली.




