ह.भ.प.रामराव ढोक महाराज आळंदीकर यांचे निटूर येथे भव्य सुश्राव्य कीर्तन सोहळा..
दि.29 आँक्टोबर 2021 रोजी राञी 08 ते 11 वेळेत…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील निटूर येथे स्व.विश्वनाथ गंगणे यांच्या प्रथम पुण्यसमरण कार्यक्रमानिमित्त ह.भ.प.रामराव ढोक महाराज आळंदीकर यांचे भव्य सुश्राव्य कीर्तन सोहळा दि.29 रोजी राञी 08 ते 11 यावेळेत निटूर येथील निळकंठ गंगणे यांच्या स्वगृही प्रांगणात होणार आहे.
ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या भव्य सुश्राव्य कीर्तन सोहळ्यासाठी निटूर आणि परिसरातील भाविक-भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक बालाजी गंगणे,निळकंठ गंगणे,प्रसाद गंगणे यांनी केले आहे.या भव्य कीर्तन कोरोना नियमावलीचे पालक करणे आवश्यक असल्याचे निळकंठ गंगणे यांनी संवाद साधताना व्यक्त केले.कीर्तनस्थळी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले.
एकंदर,निटूरनगरीत प्रथमच ह.भ.प.रामराव ढोक महाराज आळंदीकर यांचे भव्य सुश्राव्य कीर्तन सोहळा होणार असल्याने भाविक-भक्तगणांची उपस्थिती राहणार आहे.प्रथमपासून सांप्रदायिकतेचे निटूर म्हणून ओळख निर्माण झाली आहे.( सन 1993-94 ) मधील सर्वच बॅचच्या मिञपरिवाराने यात सहभाग नोंदविण्याचा आग्रह निळकंठ गंगणे यांनी व्यक्त केला आहे.