१५ ऑगस्ट रोजी आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते
हिंद गॅस जिल्हा वितरण एजन्सीचा होणार शुभारंभ
लातूर दि.१२ :- देशवासीयांच्या सेवेत नव्यानेच सुरू झालेल्या हिद गँस या कंपनीच्या गॅसच्या लातूर जिल्हा वितरण एजन्सीचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभ हस्ते 15 ऑगस्ट 2021 रोजी लातूर येथे आहे.
घरगुती, कमर्शियल, उद्योग आदी वापराकरिता अत्यंत दर्जेदार आणि ग्राहकाचे हित लक्षात घेऊन अत्यंत माफक दरात गरजूंना गॅस देण्यासाठी लातूर जिल्हा वासियांच्या सेवेत हिंद गॅस ही कंपनी सुरू झाली आहे. सदरील कंपनीचे लातूर जिल्हा वितरक श्री स्वामी समर्थ सर्व्हिसेस या एजन्सीचा शुभारंभ 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी शुभ आशीर्वाद देण्याकरिता उत्तरेश्वर पिंपरी येथील ह. भ. प. नारायण महाराज त्याचबरोबर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर दिपक सूळ, हिंद गॅस कंपनीचे कार्यकारी संचालक तथा उद्योजक तुकाराम नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संपूर्ण मराठवाड्यात सर्वप्रथम लातूर येथील हिंद गॅस एजन्सीचा शुभारंभ होत असून सदरील समारंभ कॉक्सिट कॉलेज समोर अंबाजोगाई रोड लातूर येथे 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता होत असून या कार्यक्रमास उद्योग व्यवसाईकासह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रमुख विक्रते श्री स्वामी समर्थ सर्व्हिसेसचे संचालक सचिन मुंडे यांनी केले आहे.