17.8 C
Pune
Wednesday, December 17, 2025
Homeसांस्कृतिकहिरक महोत्सवी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत,

हिरक महोत्सवी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत,

   
इन द सेल ऑफ सर्व्हायवल’ या नाटकाला प्रथम पुरस्कार.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन.

मुंबई, दि. ३१ मे : ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत, श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या “इन द सेल ऑफ सर्व्हायवल” या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल नाट्य संघाचे तसेच नाट्य स्पर्धेतील इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. प्रथम आलेल्या नाटकासोबतच, साई कला कला क्रिडा मंच, पिंगुळी, कुडाळ या संस्थेच्या “बाकी शुन्य” या नाटकास द्वितीय आणि मेरिड (इंडिया) कोल्हापूर या संस्थेच्या “नेटवर्क 24×7” या नाटकासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, संगीत अशा विविध प्रकारामध्ये पारितोषिक प्राप्त कलाकारांना अमित विलासराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दि. ६ मे ते २७ मे, २०२२ या कालावधीत ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह, कोल्हापूर’, येथे संपन्न झालेल्या या हीरक महोत्सवी राज्य स्पर्धेच्या निकालाची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे केली असून, या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे इतर वर्गवारीमधील निकाल पुढीलप्रमाणे आहेत:

१. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक-  डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक- इन द सेल ऑफ सर्व्हायवल), द्वितीय पारितोषिक- केदार देसाई (नाटक- बाकी शुन्य), तृतीय पारितोषिक- विद्यासागर अध्यापक (नाटक-  नेटवर्क 24×7)

२. नेपथ्य :  प्रथम पारितोषिक- डॉ. अरुण मिरजकर (नाटक- थेंब थेंब आभाळ), द्वितीय पारितोषिक- चंदन दळवी (नाटक- बाकी शुन्य), तृतीय पारितोषिक- संतोष कदम (नाटक- आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ)

३. प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक- श्याम चव्हाण (नाटक- इन द सेल ऑफ सर्व्हायवल), द्वितीय पारितोषिक- श्याम चव्हाण (नाटक- बाकी शुन्य), तृतीय पारितोषिक- आषिश भागवत (नाटक- नेटवर्क 24×7)

४. रंगभूषा : प्रथम पारितोषिक- गणेश मांडवे (नाटक- इन द सेल ऑफ सर्व्हायवल), द्वितीय पारितोषिक- दास कवळेकर (नाटक- सौ .), तृतीय पारितोषिक- सिध्दी मारणे (नाटक- विषाद)

५. संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक- अमित साळोखे (नाटक- अंधायुग), द्वितीय पारितोषिक-  कृष्णा (नाटक- आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ), तृतीय पारितोषिक- परेश पेठे  (नाटक- थेंब थेंब आभाळ)

६. उत्कृष्ट अभिनय :  (रौप्यपदक )
पुरुष कलाकार :- सलीम शेख (नाटक- थलाई कुथल), निलेश गोपनारायण (नाटक- नात्याची गोष्ट), डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक- इन द सेल ऑफ सर्व्हायवल), श्रीराम जोग (नाटक- डहूळ), केदार देसाई (नाटक- बाकी शुन्य), अजय इंगवले (नाटक- अंधायुग), दिलीप काळे (नाटक- आला रे राजा), निलेश राजगुरु (नाटक- आला रे राजा ) राजन जोशी (नाटक- नेटवर्क  24×7), प्रशांत निगडे (नाटक- आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ).
स्त्री कलाकार:- उन्नती कांबळे (नाटक- खानदानी), श्वेता कुडाळकर (नाटक- बाकी शुन्य), प्रियंका दाभाडे गजभिये (नाटक- ॲनेक्स), विरीषा नाईक (नाटक- आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ), रेवती शिंदे (नाटक- ज्याचा त्याचा प्रश्न), सायली रौंधळ (नाटक- विषाद), केतकी कुंभारे (नाटक- शिंदळ), मिनाक्षी बोरकर (नाटक- थलाई कुथल), अश्विनी खाडीलकर (नाटक- थेंब थेंब आभाळ), श्रृती देसाई जांभळे (नाटक- सौ ).

७. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे :
स्त्री कलाकार :- गायत्री तरसरे (नाटक- टेक अ चान्स ), कल्पना जोशी (नाटक- डोंगरार्थ ), प्रगती शिंदे (नाटक- शट अप ब्रुनो ), शुभांगी चव्हाण (नाटक- मुव्ह ऑन मीरा), सुजाता डांगे (नाटक-  हार्मनी विटवीन मिस्टर ॲन्ड मिसेस परस्पर).
पुरुष कलाकार :- दिपक शर्मा  (नाटक- ज्याचा त्याचा प्रश्न), महेश गावडे (नाटक- विषाद), विनय कांबळे (नाटक- इन द सेल ऑफ सर्व्हायवल), ओंकार प्रदिप पाटील (नाटक- लिअर ने जगावं की मरावं), आदित्य जांभळे (नाटक- सौ).

अतिशय जल्लोषात पार पडलेल्या या अंतिम फेरीत एकूण ३४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री.विश्वास मेहेंदळे, श्रीमती स्वरुप खोपकर, श्री.अविनाश कोल्हे, डॉ. सतिश साळूंखे आणि श्री  भोकरेे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]