औसा ;( वृत्तसेवा ):-औसा येथील हिरेमठ संस्थांनच्या 84 व्या वार्षिक महोत्सवास गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर रविवार दिनांक 21 जुलै 2024 पासून प्रारंभ झाला आहे. हिरेमठ संस्थानचे लिंगैयक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पावन समाधीस महारुद्र अभिषेक व गुरुपाद पूजा सुरेशप्पा ठेसे यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त प्रारंभ झाला आहे.
संस्थानच्या वार्षिक महोत्सवानिमित्त दिनांक 23 ते 29 जुलै 2024 या कालावधीमध्ये सायंकाळी 5 ते 7 या वेळेत स्वरसम्राट श्री. ष.ब्र. 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर यांची संगीतमय शिवकथा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 21 जुलै रोजी रात्री शि.भ.प. विवेकानंद स्वामी साकोळकर यांचे शिवकिर्तन होणार आहे. दिनांक 30 व 31 जुलै रोजी श्रीक्षेत्र उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सकाळी 8 वाजता ईष्टलिंग महापूजा व सायंकाळी 5 वाजता धर्मसभा आणि आशीर्वाचनाची अमृत पर्वणी भाविक भक्तांना लाभणार आहे.

तसेच दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी श्रीक्षेत्र उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी आणि श्रीक्षेत्र काशी येथील श्रीमद् जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये भव्य शिवदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये श्रीमद जगद्गुरु यांचे आशीर्वचन होणार आहे.
भाविक भक्तांनी श्रीमद जगद्गुरुंचे दर्शन, आशीर्वचन हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज आणि संस्थांनचे पिठाधिपती बालतपस्वी श्री .ष. ब्र. 108 निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित श्रीमद जगद्गुरु यांचे दर्शन, आशिर्वचन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री सुभाषप्पा मुक्ता, अध्यक्ष, वीरशैव समाज औसा आणि वीरशैव युवक संघटना औसा यांच्या वतीने करण्यात येत आहे.