हेमंत भोसेकर यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूरातील जुने स्वयंसेवक हेमंत भोसेकर यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी, काल मध्यरात्री हृदयविकाराचे झटक्याने चिंचवड येथे निधन झाले.
कै. भोसेकर यांची ऐन तारुण्यात आर्थिक स्थिती खूप हालाखिची होती. सायकल दुरुस्ती व सायकल भाड्याने देण्याचा त्यांचा व्यवसाय होता. दुकानात काम करता-करता आपल्या दुकानी येणाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमाची व संघ शाखेची ते माहिती समजावून सांगत. संघकार्यकर्ते व अनेक जेष्ठ पदाधिकारी व वरिष्ठ प्रचारक त्यांच्या दुकानी हजेरी लावत. दुकान तसे लहान असलेने येणारे वरिष्ठ प्रचारक उभे राहूनच कै. भोसेकर यांचेशी चर्चा करीत.
आणिबाणीच्या काळात कै. भोसेकर यांनी सत्त्याग्रहात भाग घेतला होता. याकाळात त्यांना प्रदीर्घ काळ कारागृहात ठेवण्यात आले होते. याचा त्यांच्या कुटुंबीयांना फार मोठा आर्थिक व मानसिक फटका बसला पण पुढे त्यांना यातून सावरणेस खूप खूप उशीर झाला.
काळाच्या ओघात कै. भोसेकर यांनी विविध व्यवसाय करीत चिंचवड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि ते चिंचवडवासी झाले तरी पंढरपूरातील संघकामाची ते नेहमीच माहिती घेत. पंढरपूरात आलेवर जुन्या कार्यकर्त्यांची भेट घेणे ते विसरत नसत. आता कुठे त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होत असताना त्यांचे असे अचानक जाणेने त्यांच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना खूप मोठा धक्का बसला आहे.
ओम् शान्ति
– रमेश घळसासी


