23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeठळक बातम्या*१ हजार रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेचा लिपिक पकडला रंगेहाथ*

*१ हजार रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेचा लिपिक पकडला रंगेहाथ*

कारवाईमुळे शासकीय , निमशासकीय कार्यालयातील खाबूगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर

इचलकरंजी–वैद्यकिय बिलाची फाईल विनात्रुटी पडताळणीसाठी १ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने इचलकरंजीमहापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील लिपिक बाबासाहेब आण्णा माळी याला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शासकीय , निमशासकीय कार्यालयातील खाबूगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

तक्रारदार यांच्या आई इचलकरंजी महापालिकेत नोकरीस आहेत. त्यांनी वैद्यकिय बिल पडताळणी करण्यासाठी दिले होते. सदरचे बिल बाबासाहेब माळी यांच्याकडे तपासणीसाठी आले होते. ते बिल विनात्रुटी पडताळणी करुन मिळण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी करुन शुक्रवारी जुनी नगरपालिका इमारतीत सापळा लावण्यात आला होता. तक्रारदाराने माळी यांची भेट घेऊन काम करुन देण्याची विनंती केल्यानंतर माळी याने १ हजार रुपयांची मागणी केली आणि तक्रारदाराकडून रक्कम स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नितीन कुंभार, उपनिरिक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस कर्मचारी विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम,
विष्णु गुरव यांच्या पथकाने केली.दरम्यान ,या कारवाईमुळे शासकीय , निमशासकीय कार्यालयातील खाबूगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]