नैसर्गिक आपत्तीमुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटींबियांना पालकमंत्री अमित देशमुखांच्या हस्ते मदतीचे वाटप
*जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नेहमी सज्ज ठेवाव्यात
*वादळ, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती या संदर्भाने नागरिकांना पूर्वसुचना दयावी
*पावसाळयात विज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी जागृती निर्माण करावी
*शहर व ग्रामिण भागात झाड कोसळुन नुकसान होवु नये यासाठी यंत्रणा अशा झाडाचे सर्व्हेक्षण करून घ्यावे.
*विजेचा शॉक लागून कोणाचाही मृत्यू होणार नाही यासाठी सबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी
*पावसाळयात भिती व घरे कोसळून दुर्घटना घडू नयेत यासाठी ग्रामपंचायत, नगरपालीका,महानगरपालीकांनी काळजी घ्यावी आदी निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

लातूर,दि.31पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीमुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटींबियांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोविड-19 आढावा बैठकीच्या वेळी करण्यात आले. आकांकशा रमेश काळे, माऊली राम पवार, काकासाहेब गोरोबा भंडे आणि मारोती सिदराम कांबळे याच्या कूटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रोपये मदतनिधीचे धनादेश अदा करण्यात आले,यावेळी लातूर महानगर पालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे,जिल्हाधिकारी पृथ्वीराज बि.पि, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,पोलीस अधीक्षक निखील पिंगळे,मनपा आयुक्त अमन मित्तल,ॲड.दीपक सूळ,जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड.किरण जाधव,विजय देशमुख,समद पटेल,चंद्रकांत मद्दे,कल्याण पाटील,अभय साळुंके,संतोष सोमवंशी,सुनिता चाळक,लिंबनअप्पा रेशमे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नैर्सगीक आपत्तीमुळे मृत्यु पावलेल्या लातूर आणि परीसरातील व्यक्तीच्या कुंटूबियांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. संकटात आणि अडचणीच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाण्यात राज्य शासन तत्पर आहे तेंव्हा जिल्हास्तरावरील यंत्रणांनी सजग राहून आपत्तीमध्ये कोणाचाही मृत्यू होणार नाही किवा इतर नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी . नियतीच्यापुढे माणूस हतबल असतो परंतू आपत्ती येण्यापूर्वी आपल्याला सावधानतेचा इशारा मिळतो.वेळीच उपाय योजना करणे आपल्या हातात आहे.महानगर पालिकेने शहरातील जीर्ण झालेल्या इमरती आणि झाडांचा शोध लावून उचित कार्यवाही करावी.तसेच जिल्हाधिकारी यांनी वीजरोधक यंत्रांचा जाळा उभा करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा.असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले
नागरिकांच्या जीवनाची रक्षा करणे प्रशासनाचा कर्तव्य आहे.जीर्ण झालेल्या इमारती आणि झाडांमुळे लोकांचे जीव जाणे अतिशय दुखद आहे.घरातल्या माणसाची अचानक मृत्यु असहनीय असते. जिल्हा प्रशसन आपल्या दुखात आपल्या बरोबर आहे. यावेळी मृतांच्या आतम्यास शांती वाहन्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोविड-19 आढावा बैठकीसाठी उपस्थित सर्व अधिका-यांनी उभे राहुन श्रध्दांजली वाहिली .












